तृतीयपंथीयांना द्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक न देता शाळा / महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्या,आशा स्पष्ट सूचना समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिल्या आहेत.

तृतीयपंथीयांना द्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तृतीयपंथीय (transgender) हा समाजातील एक दूर्लक्षित घटक असून या घटकाला समाजाकडून सापत्न व भेतदाभावाची वागणूक दिली जाते.त्यामुळे हा घटक विकास प्रक्रियेतून दूर राहिला आहे. मात्र, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना (transgender students) वेगळी वागणूक न देता शाळा / महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्या,आशा स्पष्ट सूचना समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया (Social Welfare Commissioner Om Prakash Bakoria) यांनी दिल्या आहेत.त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) सुध्दा संलग्न महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणतीही टाळाटाळ करू नये,असे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

हेही वाचा : विद्यापीठातील वादाला गृहमंत्र्यांचे अभय आहे का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

केंद्र शासनाने तृतीयपंथीयांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण अधिनियम 2019-व 2020 लागू केला आहे.तृतीयपंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना विकास प्रवाहात आणणे गरजेचे आहे.मात्र,तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जाते. परिणामी त्यांना शिक्षण घेताना अडचणी येतात.तसेच त्यांच्यावर मानसिक परिणाम होतो. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता त्यांना शाळा/ महाविद्यालयात प्रवेश द्यावा. प्रवेशास कोणतीही टाळाटाळ करू नये.तसेच तृतीयपंथीय या समाज घटकांच्या प्रश्नावर कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून शाळा प्रवेशातील अडचणीबाबत संपर्क झाल्यास सहकार्य करावे,अशा सूचना समाज कल्याण विभागातर्फे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू व कुलसचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.

समाज कल्याण विभागाने पाठविलेल्या पत्रानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांनी तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत अडचणी येणार नाहीत,याबाबत दक्षता घ्यावी,असे पत्राद्वारे कळवले आहे. 
-------------------------------------------

शाळा, महाविद्यालयांमध्ये ट्रान्सजंडर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तुम्ही असे का बोलता, असे का चालता, असे इतर विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जातात. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये ट्रान्सजंडरसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नसतात. त्यामुळे हे विद्यार्थी पाणी कमी पितात.परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयात या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधायला हवीत. 

 - सोनाली दळवी, तृतीयपंथीय कार्यकर्त्या