सीईटी सेलकडून महत्वाच्या सुचना; अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरताना घ्या काळजी...

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करीता विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

सीईटी सेलकडून महत्वाच्या सुचना; अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरताना घ्या काळजी...
MHT CET Cell 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया (Admissions 2023) सुरू झाली आहे. सीईटी सेलकडून (CET Cell) ही प्रक्रिया राबविली जात असून त्यासाठी सेलकडून विद्यार्थ्यांना (Students) महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सुचनांचे पालन करूनच विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थींना प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करीता विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून उमेदवारांनी या साठी आपला प्रवेश अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरुन अर्ज अपूर्ण राहाणे, चुकीच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज भरला जाणे, कागदपत्रांची योग्य पडताळणी/पुर्तता न झाल्यामुळे अर्ज नामंजूर होणे अशा बाबी टाळता येतील.

अखेर ‘कृषी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करताना ज्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घ्यावयाचा आहे त्या अभ्यासक्रमाच्या लिंकला भेट देवून उमेदवारांनी त्या अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (Activity Schedule) व केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे (Information Brochure) वाचन करुन अर्ज भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी राज्य सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या वर्षापासून अर्ज भरणे अधिक सोईस्कर व्हावे यासाठी ऑनलाईन अॅप उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

अर्ज स्वत:च भरा

उमेदवारांनी शक्यतोवर आपला अर्ज स्वत:च भरावा. त्रयस्थ व्यक्ती, सायबर कॅफे मार्फत अर्ज भरणे अपरीहार्य असल्यास अर्जातील माहिती (उदा. नाव, छायाचित्र, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, गुणपत्रकावरील गुण इत्यादी) अचुक भरण्यात आलेली आहे हे तपासून पहावे. उमेदवारांनी आपण सादर केलेला ऑनलाईन अर्ज ई पडताळणी केंद्रामार्फत (E Scrutiny Center) तपासणी करण्यात आलेला आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी.

तलाठी पदाच्या भरतीचा मुहूर्त सापडला; अखेर जाहीरात प्रसिद्ध

कागदपत्रांची खात्री करा

उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. राज्य अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रमाणपत्र (राज्य शासन नमुन्यात), जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्याचप्रमाणे विशेष राखीव प्रवर्गासाठी (उदा. डोंगरी दाखला) आवश्यक प्रमाणपत्रे विहीत नमुन्यातील व विहीत मुदतीतील असणे आवश्यक आहे.

प्रवेश निश्चित करताना घ्या काळजी

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमधून जागावाटप झाल्यानंतर माहिती पुस्तिका (Information Brochure), तात्पुरते जागावाटप पत्र (Provisional Allotment Letter) व केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकामध्ये (CAP Activity Schedule) मध्ये नमुद सुचनांचे वाचन करून त्याप्रमाणे प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही करावी. याबाबत कोणतीही अडचण आल्यास उमेदवारांनी सीईटी सेलच्या मदत केंद्राशी (Help Desk) दूरध्वनी/ईमेलद्वारे तात्काळ संपर्क साधावा.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर ; आजपासूनच ऑनलाईन नोंदणी

तर प्रवेश होईल रद्द

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमधून आपणास ज्या संस्थेत प्रवेश मिळालेला आहे अशा संस्थेत प्रवेश निश्चित करताना ऑनलाईन पध्दतीने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती संस्थेत तपासुन जमा करणे अनिवार्य आहे. संस्थेत प्रवेश घेताना आपण ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रतो उपलब्ध नसल्यास किंवा त्यात काही तफावत असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार आपणास मिळालेला प्रवेश रद्द होवू शकतो याची सर्व उमेदवारांनी गांभिर्याने दखल घ्यावी, असे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2