'समूह विद्यापीठे: संधी व आव्हाने'  या विषयावर चर्चासत्र

विचार मंथन  करून परीपूर्ण आराखडा तयार व्हावा ,या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केले आहे. 

'समूह विद्यापीठे: संधी व आव्हाने'  या विषयावर चर्चासत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) राज्यात शैक्षणिक संस्थांना विविध महाविद्यालयांच्या एकात्रीकरणातून क्लस्टर विद्यापीठांची (cluster University) स्थापना करता येणार आहे. त्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने  (State Department of Higher and Technical Education ) प्रसिध्द केली असून येत्या ३० जूनपर्यंत त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. मात्र, त्यावर सर्वांगाने चर्चा व्हावी, या उद्देशाने पुणे एज्युकेशन फोरमच्या माध्यमातून 'समूह विद्यापीठे: संधी व आव्हाने'  या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे,असे आव्हान फोरमचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले आहे. 
         क्लस्टर विद्यापीठाचे लीड करणा-या कॉलेजची विद्यार्थी संख्या दोन हजार असावी,क्लस्टरमधील सर्व कॉलेज लीड कॉलेजपासून २५ किलोमीटरच्या अंतरात असावीत, क्लस्टर विद्यापीठासाठी किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच अनुदानित किंवा विनानुदानित महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाखाली सुरू असावीत,अशा क्ल्स्टर विद्यापीठ स्थापनेसाठीचा प्रस्तावित नियमावलीचा आराखडा प्रसिध्द करण्यात आला आहे.त्यावर विचार मंथन  करून परीपूर्ण आराखडा तयार व्हावा,या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित केले आहे. 

" क्लस्टर विद्यापीठांच्या आरखड्याच्या आधारे त्यासंदर्भातील कायदा तयार होणार असून त्यांचे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत.त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणा-या विद्यार्थी,पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , संस्थांचालक या सर्वांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन मत नोंदवावे. त्यातून परिपूर्ण असा आराखडा तयार होईल. "
- राजेश पांडे. अध्यक्ष , पुणे एज्युकेशन फोरम
-------------