अखेर ‘कृषी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

राज्यातील एकूण १२ हजार ६९० जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ९ जुलैपर्यंत देण्यात आली आहे.

अखेर ‘कृषी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश
Agriculture Admission Procees

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील कृषी विद्यापीठे (Agriculture Universities) व संलग्न महाविद्यालयांमधील नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील (Maharashtra) एकूण १२ हजार ६९० जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ९ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. (B.Sc. Agri Degree Courses Admission Process)

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी.एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ्.एस्सी. (मत्स्यविज्ञान), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी. टेक. (जैवतंत्रज्ञान) आणि बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर ; आजपासूनच ऑनलाईन नोंदणी

पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी किमान पात्रता –

  • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान १६ वर्षे असावे.
  • पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता १२ वी विज्ञान) खुल्या गटातील उमेदवारास ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावे. याचबरोबर सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्याना किमान गुण शुन्य पेक्षा जास्त असावेत.

प्रवेश प्रक्रिया व अभ्यासक्रमांविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - https://ug.agriadmissions.in/Downloads/2023-24/Prospectus%20Marathi.pdf

 

कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक -

ऑनलाईन अर्ज भरण्याण्याची अंतिम मुदत – ९ जुलै

तात्पुरती गुणव्ता यादी – १३ जुलै (सायं. ५.३० नंतर)

हरकती व तक्रारी करणे – १४ ते १६ जुलै

नोंद घेतलेल्या हरकतींची यादी प्रसिध्द करणे – १८ जुलै (सायं. ५.३० नंतर)

अंतिम गुणवत्ता यादी – २० जुलै (सायं. ५.३० नंतर)

पहिल्या फेरीची निवड यादी – २२ जुलै (सायं. ५.३० नंतर)

महाविद्यालयांमध्ये प्रवेश घणे – २३ ते २५ जुलै

महाविद्यालय व प्रर्गनिहाय कटऑफ – २६ जुलै

दुसऱ्या फेरीची निवड यादी – २७ जुलै (सायं. ५ नंतर)

महाविद्यालयत प्रवेश – २८ ते ३० जुलै (सायं. ५.३० पर्यंत)

महाविद्यालय व प्रर्गनिहाय कटऑफ – १ ऑगस्ट

तिसऱ्या फेरीची निवड यादी – २ ऑगस्ट (सायं. ५.३० नंतर)

महाविद्यालयांमध्ये प्रवेश घणे – ३ ते ५ ऑगस्ट (सायं. ५.३० पर्यंत)

प्रवेश निश्चित झालेल्या महाविद्यालयात मूळ कागदपत्रे सादर करणे व शुल्क भरणे – ३ ते ६ ऑगस्ट

रिक्त जागांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया – ९ ते १४ ऑगस्ट

संस्थानिहाय कोटा प्रवेश – १० ते २० ऑगस्ट

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2