बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप चाळणी परीक्षेची नवी तारीख ठरली 

येत्या 10 जानेवारी रोजी पुन्हा ही चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप चाळणी परीक्षेची नवी तारीख ठरली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार्टी, सारथी, महाज्योती (Barti , Sarathi , Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी (fellowship) घेण्यात आलेली चाळणी परीक्षा रद्द (Exam cancelled) केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)सेट विभागातर्फे (set department) नव्याने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.येत्या 10 जानेवारी रोजी पुन्हा ही चाळणी परीक्षा घेतली जाणार असून बार्टी, सारथी, महाज्योती संस्थांच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल,असे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी 24 डिसेंबर रोजी पुणे, छत्रपती सांभाजीनगर , औरंगाबाद आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्यात आली. मात्र,पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत 2019 झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना दिली गेली.मात्र,त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. तसेच  परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे,सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख अधिकारी आणि विद्यापीठाचे पदाधिकारी यांनी याबाबत चर्चा करून पुन्हा परीक्षा घेण्याचे निश्चित केले.

हेही वाचा : नव्या व दूर्लक्षित अभ्यासशाखांना गवसणी घालणारे 'मराठी भाषा विद्यापीठ' : डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांची विशेष मुलाखत
 
दरम्यान,फेलोशिप चाळणी परीक्षा अतितत्काळ विहित काल मर्यादेत आयोजन करण्याबाबत सेट विभागाला सूचित करण्यात आले होते. पीएच.डी. फेलोशिप चाळणी परीक्षा आणि सेट या दोन्ही परीक्षा भिन्न कारणांसाठी आयोजित केल्या जात असल्याने प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने कोणत्याही विद्यार्थास फायदा अथवा नुकसान संभवत नाही.तसेच ही चाळणी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने पार पडली. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता येत्या 10 जानेवारी 2024 रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्याचे ठवले आहे,असे सेट विभागाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.