CSIR UGC NET परीक्षा 2024 च्या अर्जातील दुरुस्तीला सुरूवात 

अर्ज दुरुस्ती विंडो  31 मे 2024 मध्यरात्रीपर्यंत खुली राहील.

CSIR UGC NET परीक्षा 2024 च्या अर्जातील दुरुस्तीला सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR ) UGC  NET परीक्षा 2024 च्या अर्जामध्ये दुरुस्तीसाठी विंडो उघडली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे अर्ज दुरूस्त करायचे आहेत ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तसेच आपल्या अर्जात सुधारणा करू शकतात.विद्यार्थी  CSIR UGC NET च्या csirnet.nta.ac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जात दुरुस्ती करू शकतात.

अर्ज दुरुस्ती विंडो  31 मे 2024 मध्यरात्रीपर्यंत खुली राहील. उमेदवार अर्जात उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, लिंग, जन्मतारीख, श्रेणी, राष्ट्रीयत्व,  कोणत्या विषयांसाठी अर्ज केला आहे, परीक्षा केंद्र कोठे निवडायचे आहे, या बाबींमध्ये दुरुस्ती करू शकतात.

अशी करू शकता अर्जात दुरुस्ती

* CSIR UGC NET परीक्षेच्या अर्जात सुधारणा करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटcsirnet.nta.ac.in. वर जा.

* येथे मुख्यपृष्ठावर तुम्हाला फॉर्म दुरुस्ती विंडो दिसेल, त्यावर क्लिक करा.

* उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये, तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड, सुरक्षा पिन इत्यादी तपशील प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.

* तुमचा अर्ज स्क्रीनवर दिसेल.

* इथून एडिट करून पुन्हा एकदा तपासून बघा, काही त्रुटी दिसल्यास वेळीच दूर करा.


* दुरुस्त केलेला अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा. 


* अर्जाची प्रिंट आउट घ्या