अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 : निकाल 'या' तारखेनंतर जाहीर होणार

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (FCS) ने काही दिवसांपुर्वी एकूण ३४५ रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) आणि पुरवठा निरीक्षक (गट-सी) यासह विविध परीक्षेचा निकाल येत्या ४ जूननंतर घोषित केला जाईल.

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 :  निकाल 'या' तारखेनंतर जाहीर होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने (FCS) काही दिवसांपुर्वी एकूण ३४५ रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) आणि पुरवठा निरीक्षक (गट-सी) यासह विविध पदांसाठी भरती परीक्षा (Recruitment Exam) घेतल्या. तीन महिन्यापुर्वी 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ही परीक्षा झाली. हजारो उमेदवारांनी परीक्षा दिली असून आता सर्व उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, या परीक्षेचा निकाल येत्या ४ जूननंतर (Result of Exam after 04 June 2024) घोषित केला जाईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील पुरवठा निरिक्षक व उच्चस्तर लिपीक पदाच्या एकूण ३४५ जागांची सरळसेवा भरती- २०२३ करिता आय.बी.पी.एस. (Institute of Banking Personnel Selection) मार्फत २६, २७, २८ व २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी राज्यातील २३ जिल्ह्यांतील एकूण ७३ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. 

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक परीक्षा 2024 ची लेखी परीक्षा घेतली. आता परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि परीक्षेला हजेरी लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक निकालाची प्रतीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल जून महिन्यात कधीही जाहीर होऊ शकतो, कारण तो बराच काळवाढीपासून प्रलंबित आहे. मात्र, अन्न पुरवठा निरीक्षक निकाल 2024 https://mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.