NIOS कडून दहावी , बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थी NIOS च्या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू  शकतात.

NIOS  कडून दहावी , बारावी परीक्षेचा निकाल जाहीर
 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे (NIOS)  ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या  इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.  परीक्षेला बसलेले विद्यार्थी NIOS च्या अधिकृत results.nios.ac.in या वेबसाइटवर आपला निकाल पाहू  शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी व बारावीच्या  परीक्षा ३ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत घेतल्या होत्या. दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा : केंद्रीय विद्यालय EWS विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारू शकत नाही

 निकाल डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे लॉगिन तपशील वापरू शकतात.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे मार्कशीट, प्रमाणपत्र त्यांच्या संबंधित एआयद्वारे थेट प्राप्त होईल. एआय रद्द केल्यास, संबंधित प्रादेशिक केंद्र ही कागदपत्रे संबंधित व्यक्तींना त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठवले, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगकडून स्पष्ट करण्यात आले आहे.