UPSC मुख्य परीक्षा 2023 च्या व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध 

उमेदवारांची  व्यक्तिमत्व चाचणीची (मुलाखती)  तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

UPSC मुख्य परीक्षा 2023 च्या व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 च्या व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक (Schedule of Personality Test) प्रसिद्ध करण्यात आले आहे. व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र उमेदवार UPSC च्या  upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पूर्ण वेळापत्रक पाहू शकतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार  UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेची व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत फेरी येत्या  २ जानेवारीपासून सुरू होईल आणि १६ फेब्रुवारी २०२४ रोजी संपेल. रिपोर्टिंगची वेळ सकाळच्या सत्रासाठी सकाळी ९ वाजता आणि दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता आहे. सध्या १ हजार २६ उमेदवारांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित उमेदवारांसाठी पीटी वेळापत्रक नंतर अपलोड केले जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण अग्निवीरांना नोकऱ्या देण्यासाठी आता स्वतंत्र श्रेणी

उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी (मुलाखती) ई-समन्स पत्रे लवकरच उपलब्ध करून दिली जातील, जी आयोगाच्या www.upsc.gov.in आणि www.upsconline या वेबसाइटवरून डाउनलोड करता येइल. उमेदवारांची  व्यक्तिमत्व चाचणीची (मुलाखती)  तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.