तलाठी भरती रद्दसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आग्रही

बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले

तलाठी भरती रद्दसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आग्रही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Talathi Bharti News : राज्यातील सर्व परीक्षा घोटाळयांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी.तसेच राज्य शासनाने सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घ्यावत. तलाठी भरतीत ( Talathi Bharti )गोंधळ झाल्याने ही भरती रद्द करावी,अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Opposition Leader Vijay Wadettiwar)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. त्याचाप्रमाणे सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करावा.सरकारच्या दूरलक्षांमुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे,असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात तलाठी भरतीत मोठा गोंधळ झाला आहे.अनेक उमेदवारांना 200 पैकी 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.तसेच पेपर फूटीच्या प्रकरणात आरोपी असणाऱ्यांना तलाठी भरती परीक्षेत (Talathi Bharti)180 ते 190 च्या आसपास मिळाले आहेत.त्यावर काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.त्यातच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना पास करून घेतले असा गंभीर आरोप केला आहे.त्यावर आता विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवार यांनी भूमिका घेत तलाठी भरती रद्द करण्याची मागणी केली आहे.विजय वडेट्टीवार यांनी सोशल मिडियावर ट्विटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असल्याचे स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : सरसकट फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा सारथीवर संयुक्त मोर्चा ; विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना

 युपीईएससी , एमपीईएससीच्या परीक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात घेतल्या जातात.त्यामुळे यामध्ये पारदर्शकता असते. तसेच या परीक्षांमध्ये घोटाळे हॉट नाहीत.खासगी कंपन्यामार्फत घेतलेल्या परीक्षते घोटाळे होता आहेत.हे माहीत असून देखील खासगी आयटी कंपन्यांसाठी अट्टहास कशासाठी हा खरा प्रश्न आहे,असे वाडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
एमपीएससी वर्ग 3 कर्मचारी यांच्या परीक्षा घेण्यास तयार आहे.सर्व प्रकारांच्या परीक्षा घेण्यास एमपीएससी सक्षम आहे.त्यासाठी एमपीएससीला मनुष्यबळ दिले पाहिजे.मात्र ते दिले जात नसल्याने ही शासकीय स्वायत्त संस्था दुबळी होत चालली आहे.या संस्थेला दुबळे करून आयटी कंपन्या बळकट करण्याचा सरकारचा उद्योग आहे.

राज्य शासनाकडून 2014 ते 2019 या कालावधीतपासून खासगी आयटी कंपन्यामार्फत शासकीय कर्मचारी यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.खासगी कंपन्या कुणाच्या आहेत. प्रश्न पत्रिका काशी फुटते यांचा शोध घेण्याची गरज आहे.पेपर फूटीबाबत या खासगी कंपन्यांच्या मालकांवर, संचालकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.कंपन्यांच्या कंराचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उपयोग होत नाही. महाराष्ट्रात तब्बल 32 लाख तरूण- तरूणी एमपीएससीची तयारी करतात.या सर्व तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे.त्यामुळे खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्याची पध्दत बंद करून सर्व परीक्षा एमपीईएससीकडे द्याव्यात,असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.