एमपीएससीचा मनमानी कारभार ? स्वत:च्या नियमांचे उल्लंघन , आयोगाचे अध्यक्ष लक्ष घालणार का ?

निकाल जाहीर करताना आयोगाने स्वत:च तयार केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.

एमपीएससीचा मनमानी कारभार ?  स्वत:च्या नियमांचे उल्लंघन , आयोगाचे अध्यक्ष लक्ष घालणार का ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  (Maharashtra Public Service Commission) नुकताच  2023 चा एसटीआय आणि दुय्यम निबंधक  पदांचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर (Preliminary Exam Result Declared) करत सर्व साधारण यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, निकाल जाहीर करताना आयोगाने स्वत:च तयार केलेल्या नियमावलीचे उल्लंघन (Violation of regulations) केल्याची बाब समोर आली आहे.स्वतंत्र याद्या जाहीर केल्यामुळे चारही पदांच्या याद्यामध्ये तेच तेच उमेदवार दिसून येत आहेत.परिणामी यापुढील काळात ऑपटींग आऊटच्या (Opting out)नावाखाली पैशाचा घोडेबाजार होऊ शकतो.त्यामुळे आयोगाने आपली चुका दुरूस्त करून स्वत:च जाहीर केलेल्या नियमावलीनुसार निकाल जाहीर करावा,अशी मागणी केली जात आहे.

एमपीएससीतर्फे जाहिरात क्रमांक एनओटी -3617/ सीआर-130/ 2022 नुसार सहायक कक्ष अधिकारी, गट ब (अराजपत्रित), राज्य कर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक यासाठी एकूण 746 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 15 सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती तपशीलवार देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने निकाल कसा प्रसिद्ध केला जाईल हे सुध्दा नमूद करण्यात आले आहे. सर्व साधारण गुणवत्ता यादी ही कशी प्रसिध्द होईल, याबाबत सविस्तर तपशील दिला आहे. शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गांकरिता मुख्य पेपर (पेपर कामांक -1 व पेपर क्रमांक-2) तसेच मुलाखातीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल,असे नियम क्रमांक 11.1.1 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.तसेच सहायक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-1) मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या निवडीकरिता मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमांकानुसार यादी तयार करण्यात येईल,असे 11.1.2 मध्ये नमूद केले आहे.मात्र हे दोन्ही नियम डावलले आहेत.त्याचाप्रमाणे संवर्ग किंवा पदाचा पसंतीक्रम देण्याबाबतही स्वतंत्र नियम दिले आहेत.परंतु, आयोगाने हे दोन्ही नियम डावलून थेट गुणवत्ता याद्या जाहीर केल्या आहेत.

स्वतंत्र गुणवत्ता याद्या जाहीर केल्यामुळे सर्व याद्यांमध्ये एकसारखे उमेदवार दिसून येत आहेत.त्यामुळे ऑपटींग आऊटमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयोगाने स्वत:च जाहिरातीमध्ये प्रसिध्द केलेल्या नियमांचे पालन करून फेर निकाल जाहीर करावा,अशी मागणी उमेदवार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतं संपर्क होऊ शकला नाही. 

दरम्यान, यापूर्वी सुद्धा 2019 मध्ये एमपीएससीने नियम डावलून वनसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.मॅटने आयोगाला निकाल बदलण्यास सांगितले होते.मात्र, आयोगाने यातून कोणताही धडा घेतला नाही,अशी चर्चा सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्तुळात केली जात आहे.
----------------------------------------


जाहिरात मध्ये दिलेले नियम आयोगाकडून पाळले जात नसतील तर उमेदवारानी काय करायचं हा मोठा प्रश्न सध्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदारांमध्ये निर्माण झाला आहे.जाणून बुजून उमेदवारांना मानसिक त्रास देण्याचा हेतू दिसत आहे .स्वलीखित नियम असताना सुद्धा आयोगला  विसर पडतोच कसा हा चिंतेचा विषय आहे.
- आजम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते