भावी अधिकाऱ्यांनो सावधान! निकालानंतर गुलाल, फटाके, कर्ण कर्कश वाद्यांचा वापर केल्यास कारवाई

यापुढे गुलाल, फटाके, कर्कशवाद्य इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

भावी अधिकाऱ्यांनो सावधान! निकालानंतर गुलाल, फटाके, कर्ण कर्कश वाद्यांचा वापर केल्यास कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी (Competitive Examination Students) निकालानंतर गुलाल, फटाके, कर्कशवाद्य (Gulal, Fireworks, D.J) इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे. यापुढील काळात असे प्रकार समोर आल्यास गुन्हे दाखल केले जातील (Cases will be filed) , असा  इशारा पोलीस प्रशासनाकडून फलकांवर मुजकूर लिहून देण्यात आला आहे. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भावी अधिकाऱ्यांना सूचनावजा इशारा देण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येणे लज्जास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे. 

आम्ही आधीपासून, निवडीनंतर कर्णकर्कश डिजे आणि फटाके या प्रथेविरुद्ध आहोत. मित्रांनो तुम्ही पोस्ट कष्टाने आणि संघर्षाने मिळवता यात शंका नाही, तुमच्या यशाचे कौतुक आहेच, तुमचं यश इतरांना प्रेरणादायी ठरावे त्रासदायक नको, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्स या सोशल मीडिया अकाऊंट वर म्हटले आहे. 

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल, फटाके, कर्कशवाद्य इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत असल्याने रहिवाशांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केलेली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना तशी समज सुद्धा देलेली आहे. 

तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान व आनंद आहे. आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की, आपण आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून तसेच पुष्पगुच्छ देऊन साजरा करावा. यापुढे गुलाल, फटाके, कर्कशवाद्य इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारचे मुजकूर असलेले फलक पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत.