MAH CET 2024 : नर्सिंग प्रवेश परीक्षाच्या नोंदणी अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ

इच्छुक उमेदवार 25 एप्रिलपर्यंत mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला अर्ज भरु शकतात. 

MAH CET 2024 : नर्सिंग प्रवेश परीक्षाच्या नोंदणी अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे  MAH नर्सिंग CET 2024 (MAH Nursing CET 2024) साठी नोंदणी अर्जाची अंतिम तारीख (Date extended ) पुन्हा एकदा 25  एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. MAH नर्सिंगला अॅडमिशन घेणाऱ्या उमेदवारांना ही तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या मुदतवाढीनुसार अर्ज भरण्यास १५ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, आता  इच्छुक उमेदवार 25 एप्रिलपर्यंत mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला अर्ज भरु शकतात. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसविका (ए.एन.एम.) व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जी.एन.एम.) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएच-नर्सिंग सीईटी-२०२४ करीता उमेदवारांचे अर्ज नोंदणीस संदर्भाधिन प्रसिद्ध सुचनेद्वारे दिनांक १५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. उमेदवार व पालकांकडून सीईटी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळवण्याबाबत विनंती करण्यात आली. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन एमएच-नर्सिंग सीईटी-२०२४ च्या नोंदणी प्रक्रियेसाठी २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी सुचना सीईटीची सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) वगळता महाराष्ट्र राज्यातील एखाद्या संस्थेतून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी पुनर्नोंदणी 1 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करू शकतात. 

असा करा नोंदणी अर्ज

प्रथम MAHACET च्या अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नर्सिंग सीईटी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन पृष्ठावर स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी जमा करा. फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.