Talathi Bharti : विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल शासनाने व्यक्त केली दिलगिरी

राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावर नियोजीत करणेत आली होती. या परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९ ते ११ नियोजीत करणेत आले होते.

Talathi Bharti : विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल शासनाने व्यक्त केली दिलगिरी
Talathi Bharti 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra Recruitment 2023 : राज्यात सुरू असलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी खोळंबा झाला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याबद्दल शासनाने (Maharashtra Government) दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्य परिक्षा समन्वयक व जमाबंदी आयुक्त आनंद रायते (Anand Rayate) यांनी याबाबत सविस्तर खुलासा प्रसिध्द केला आहे.

आनंद रायते यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे की, तलाठी भरतीची परीक्षा दि. २१ ऑगस्ट रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावर नियोजीत करणेत आली होती. या परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९ ते ११ नियोजीत करणेत आले होते. पण टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे सत्र वेळेनुसार सुरु करण्यात अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले.

Talathi Bharti : पेपरफुटीनंतर आता सर्व्हर डाऊन, यात काही काळंबेरं आहे?

टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परिक्षासंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११ वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविणेत आले. राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु होईल असे कळविणेत आले.

त्याप्रमाणे सर्व परिक्षाकेंद्रांवरील परिक्षार्थीना याची सुचना देण्यात आली. टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करणेत येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना यावत सुचित करणेत येवून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११ वाजता परिक्षा सुरु करण्यात आल्याचे रायते यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदललेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करणेची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात येत आहे. तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे, अशी विनंती रायते यांनी केली आहे.

सर्व परिक्षार्थीना नियोजित दोन तासांचा वेळ परिक्षेसाठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात येणार आहे. आज टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांचे कडून तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनस्तापाबद्दल शासनाच्या वतीने दिलगीरी व्यक्त करीत असल्याचे रायते यांनी नमूद केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo