आरोग्य खात्यात तब्बल ११ हजार पदांची मेगाभरती; आजपासूनच भरा अर्ज

गट क मधील सर्वाधिक १ हजार ६७१ पदे पुणे मंडळातील असून १ हजार ९० पदे नागपूर मंडळातील आहेत. तर नाशिक मंडळात १ हजार ३१, ठाणे ८०४, कोल्हापूर ६३९, औरंगाबाद ४७०, लातूर ४२८ आणि अकोला मंडळात ८०६ पदांची भरती केली जाणार आहे.

आरोग्य खात्यात तब्बल ११ हजार पदांची मेगाभरती; आजपासूनच भरा अर्ज
Health Department Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या विविध विभागांची पदभरती (Maharashtra Recruitment) प्रक्रिया सुरू असून आता आरोग्य विभागातही (Health Department) मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. या विभागात तब्बल १० हजार ९४९ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये क व ड संवर्गातील विविध ६० पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून इच्छूकांना आजपासूनच ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

आरोग्य विभागाकडून गट क व गट ड ची भरती जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यानुसार इच्छूकांना आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजपासूनच ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. आरोग्य विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर पदभरतीबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज दि. १८ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत.

दीपक केसरकरांची घोषणा हवेतच; शिक्षक भरती कधी सुरू होणार?

गट क मधील सर्वाधिक १ हजार ६७१ पदे पुणे मंडळातील असून १ हजार ९० पदे नागपूर मंडळातील आहेत. तर नाशिक मंडळात १ हजार ३१, ठाणे ८०४, कोल्हापूर ६३९, औरंगाबाद ४७०, लातूर ४२८ आणि अकोला मंडळात ८०६ पदांची भरती केली जाणार आहे. ही पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. त्यासाठी उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्यात परिमंडळात अर्ज भरावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गट ड मधील ४ हजार १० पदे भरली जाणार असून सर्वाधिक ३५२ पदे पुणे जिल्ह्यात आहेत.  

भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने इच्छूकांना परीक्षा शुल्कही ऑनलाईन भरावे लागेल. खुल्या गटासाठी एक हजार रुपये आणि इतरांसाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाईल. एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरणाऱ्यांना स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागणार आहे. भरती परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच होणार असून त्यातील गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

दरम्यान, राज्यात सध्या तलाठी, वन विभागातील विविध पदे, जिल्हा परिषदेतील विविध पदांसह इतर काही विभागांचीही भरती प्रक्रिया सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची प्रक्रियाही सुरू असून नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळपास ११ हजार पदांची भरती केली जाणार असून त्याच्या विभागनिहाय जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo