SPPU News : विद्या परिषदेवर कोणत्या दहा प्राचार्य व प्राध्यापकांची लागली वर्णी?

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरूंना कुलपतींशी विचार विनिमय करून अधिसभा, विद्या परिषदेवर तज्ज्ञ व्यक्तींची निवड करता येते.

SPPU News : विद्या परिषदेवर कोणत्या दहा प्राचार्य व प्राध्यापकांची लागली वर्णी?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विद्यापरिषदेवर (Academic Council) विविध महाविद्यालयातील १० प्राचार्य व प्राध्यापकांची नियुक्ती नामनिर्देशाने करण्यात आली आहे.मात्र, अजूनही काही नियुक्त्या रखडल्या आहेत.वर्ष उलटून गेले तरीही नियुक्त्या होत नाहीत. त्यामुळे संस्थांचालक, प्राध्यापक व प्राचार्य यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Savitribai Phule Pune University News) 

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरूंना कुलपतींशी विचार विनिमय करून आधीसभा,विद्या परिषदेवर तज्ज्ञ व्यक्तींची निवड करता येते. मात्र, सुमारे वर्ष भराहून अधिक काळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबादारी डॉ. कारभारी काळे यांच्याकडे होती.त्यानंतर सुमारे पाच ते सहा महीने प्र- कुलगुरू निवडीसाठी वाट पहावी लागली.त्यानंतर आता विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर कुलगुरूंच्या नामनिर्देशाने १० जणांची नियुक्ती करण्यात आली.विद्या परिषदेतून एक काही व्यक्ती व्यवस्थापन परिषदेवर जातात. मात्र, अजूनही ही नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे.

SPPU News : दोन कंत्राटी सहायक कुलसचिव भरणार, विद्यापीठ निधीतून वेतन

पुण्यातील गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, नाशिक जिलह्यातील सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य चंद्रशेखर उपासणी,पुण्यातील  डॉ.बी.एन.कॉलेज ऑफ आर्किटेक्टर फॉर वुमन कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, नाशिक जिलह्यातील वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सनप, ताठवडे येथील राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य राकेशकुमार जैन, पिंपरीतील डॉ.डी. वाय. पाटील फार्मास्युटिकल कॉलेजचे प्राचार्य सोहन चितलांगे,कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या प्राचार्या माधुरी खांबेटे,विद्यापीठातील विधी विभागाच्या प्रा. ज्योती भाकरे,संगमनेर मालपाणी कॉलेजचे अरुण गायकवाड आणि नारळकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. महेश आबाळे यांची विद्या परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j