Medical Admission : दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हजारो जागा राहतात रिक्त 

भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदवी अभ्यासक्रमाच्या  २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात ८३ हजार, २७५ जागांपैकी २७१ जागा रिक्त राहिल्या होत्या.

Medical Admission : दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हजारो जागा राहतात रिक्त 
Medical Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Medical Admission : दरवर्षी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. असे असले तरी देशात दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमातील रिक्त जागांची संख्याही वाढत आहे. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात देशभरातून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (Medical Courses) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४ हजार ६६१ जागा रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी संसदेत दिली आहे.

डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार "मागील वर्षी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट' (NEET PG ) समुपदेशनानंतर २०२२-२३ या वर्षी देशातील ६४ हजार ५९ पदव्युत्तर वैद्यकीय जागांपैकी ४ हजार ४०० जागा रिक्त राहिल्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर पदवी अभ्यासक्रमाच्या  २६१ जागा रिक्त राहिल्या आहेत." 

MBBS Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून

पदवी अभ्यासक्रमाच्या २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात ८३ हजार २७५ जागांपैकी २७१ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०२१-२२ या वर्षात ९१ हजार ९२७ जागांपैकी ३२६ आणि २०२२-२३ या वर्षी ९६ हजार ७७ जागांपैकी २६१ जागा रिक्त राहिल्या होत्या.  तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात ५५ हजार ४५९ जागांपैकी  ४ हजार ४१४, २०२१-२२ या वर्षात ६० हजार २०२  जागांपैकी ३ हजार ७४४ आणि २०२२-२३ या वर्षी ६४ हजार ५९ जागांपैकी ४ हजार ४०० जागा रिक्त राहिल्या होत्या.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, देशात नवीन ५० वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. या पैकी ३० सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यामध्ये  तेलंगणामध्ये १३, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच, महाराष्ट्रात चार, आसाम, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी तीन, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी दोन, मध्य प्रदेश, नागालँड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा पुन्हा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षी देखील  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD