Times Ranking : देशातील जुन्या सहा IIT संस्थांचा बहिष्कार कायम, नेमकं काय आहे कारण?

देशांतर्गत रेटिंगमध्ये अव्वल असलेल्या IIT मुंबई , IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT रुरकी, IIT कानपूर आणि IIT खरगपूर या सहा आयआयटींनी बहिष्कार टाकला आहे.

Times Ranking : देशातील जुन्या सहा IIT संस्थांचा बहिष्कार कायम, नेमकं काय आहे कारण?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

टाईम्स हायर एज्युकेशन (THE) च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत स्थान मिळवणे, ही बाब  शैक्षणिक संस्थांसाठी महत्वाची समजली जाते. असे असले तरी देशातील जुन्या सहा भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (IIT) मात्र या क्रमवारीवर बहिष्कार टाकला आहे. 'THE' कडून नुकतेच जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर केली यामध्ये  १६ खाजगी आणि २८ सार्वजनिक भारतीय विद्यापीठांसह  ९१ भारतीय संस्थांनी स्थान पटकावले आहे. (Times World University Ranking News)

 

देशांतर्गत रेटिंगमध्ये अव्वल असलेल्या IIT मुंबई , IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT रुरकी, IIT कानपूर आणि IIT खरगपूर या सहा आयआयटींनी THE च्या मुल्यांकनात “पारदर्शकता” नसल्याचे कारण देत, सलग चौथ्या वर्षी THE च्या  जागतिक विद्यापीठ क्रमवारीवर बहिष्कार टाकला आहे.  या वर्षाच्या सुरुवातीला आयआयटी दिल्ली, मुंबई  आणि मद्रासच्या प्रमुखांशी THE कडून संपर्क साधण्यात आला होता.  

अखेर IIT मुंबईमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबल

 

आयआयटीकडून मिळालेल्या सूचनांनुसार त्यांच्या क्रमवारीत केलेल्या बदलांची यादी तयार करण्यात आली होती, पण यावर असंतोष दाखवत आयआयटीने पुन्हा या क्रमवारीवर  बहिष्कार टाकला. आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना  सांगितले की, क्रमवारी निश्चित करताना पूर्वीप्रमाणे व्यक्तिनिष्ठ निकषांचा अभ्यास  आणि  पारदर्शकतेचा अभाव या गोष्टींमुळे आम्ही नाराजी दर्शवतो.  आयआयटी गुवाहाटीने मागील वर्षी रँकिंगमध्ये पुन्हा सहभाग घेतला होता. ही  संस्था सध्या क्रमवारीत ६००-८०० या क्रमवारीत आहे.

 

टाईम्स रँकिंग पाच निकषांच्या आधारे विद्यापीठांना गुणांकन देते. अध्यापन, संशोधन पर्यावरण, संशोधन गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन आणि उद्योग. पाच श्रेणींमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे विद्यापीठाची क्रमवारी निश्चित केली जाते. यावर्षी संशोधन सामर्थ्य, संशोधन उत्कृष्टता, संशोधन गुणवत्ता अंतर्गत संशोधन प्रभाव आणि उद्योग अंतर्गत पेटंट याचाही निकषांमध्ये समावेश होता.