SPPU News : दोन कंत्राटी सहायक कुलसचिव भरणार, विद्यापीठ निधीतून वेतन

विद्यापीठाकडून नुकतेच याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांकडून १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

SPPU News : दोन कंत्राटी सहायक कुलसचिव भरणार, विद्यापीठ निधीतून वेतन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (SPPU) सहायक कुलसचिवांची दोन पदे हंगामी स्वरुपात विद्यापीठ निधीतून भरली जाणार आहेत. विद्यापीठाच्या अहमदनगर (Ahmednagar) व नाशिक (Nashik) उपकेंद्रांसाठी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यापीठात विद्यापीठ निधीतून कार्यरत असलेल्या तसेच संलग्न महाविद्यालये व संस्थेत कार्यरत असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Savitribai Phule Pune University Recruitment News)

 

विद्यापीठाकडून नुकतेच याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांकडून १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या http://admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. सहायक कुलसचिव हे पद पाच वर्षांसाठी भरले जाणार आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजातील हे एक महत्वाचे पद आहे.

Times Ranking 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुन्हा घसरण, देशातील 91 संस्थांचा समावेश

या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच कक्षाधिकारी (सर्वसाधारण) किंवा समकक्ष पदाच्या वेतनश्रेणीतील किंवा या वेतनश्रेणीशी समकक्ष सातव्या वेतन आयोगानुसार मान्य वेतनश्रेणीतील पदाचा किमान तीन वर्षांच्या कामाचा अनुभव किंवा विद्यापीठ, वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावील पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शिक्षक म्हणून अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्ययक आहे. या पदासाठी किमान ३० वर्षे आणि कमाल ५० वर्षे ही वयोमर्यादा आहे.

 

ही नियुक्ती सुरूवातीला केवळ एक वर्ष कालावधीसाठी हंगामी स्वरुपात करार पध्दतीची असेल. एक वर्षे कालावधीमधील कामकाजासंबंधी विभागप्रमुख यांचा अहवाल व शिफारस विचारात घेऊन पुढील एक वर्षे कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येईल. दोन वर्षांच्या कालावधीमधील कामकाजासंबंधी विभागप्रमुख यांचा अहवाल व शिफारस विचारात घेऊन पुढील उर्वरित तीन वर्षे कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j