एकाच दिवशी १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनिसांना नियुक्तीपत्र, पाच वर्षांनंतर भरती

नवनियुक्त झालेल्या १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

एकाच दिवशी १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनिसांना नियुक्तीपत्र, पाच वर्षांनंतर भरती
CM Eknath Shinde

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. मागील ३ ते ४ वर्षापासून अंगणवाडी (Anganwadi) कर्मचाऱ्यांची भरती रखडलीच होती. त्यामुळे सुमारे २० हजार १८६ पदे रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत भरती प्रक्रियेव्दारे नवनियुक्त झालेल्या १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आयसीडीएसच्या आयुक्त रूबल अग्रवाल, आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालिका उमा आहुजा आदी उपस्थित होते.

Talathi Bharti : पेपर डाऊनलोड करण्यासाठी लॅपटॉप थेट परीक्षा केंद्राबाहेर, विद्यार्थ्यांकडून आक्षेप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागील ३ ते ४ वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती रखडलीच होती. त्यामुळे सुमारे २० हजार १८६ पदे रिक्त होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला असून सेविकेंना १० हजार तर मिनी अंगणवाडी सेविकांना ७ हजार २०० आणि मदतनीस यांना पाच हजार रूपयांपर्यंतचे मानधन वाढवले आहे. अंगणवाड्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये संख्यात्मकता आणि गुणात्मकता यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पद्मभूषण स्वर्गीय ताराराणी मोडक यांनी अंगणवाडी सेवेचा पाया घातला. त्यांचे कार्य पाहूनच तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात अंगणवाडी संकल्पना सुरू केली. बालकांना शिक्षण देणे व त्यांचं योग्य पोषण करून त्यांचा मानसिक विकास करणे यामध्ये मोलाची कामगिरी अंगणवाडी कर्मचारी बजावत असतात. त्यांच्या हातून एक प्रकारे राष्ट्र उभारण्याचे कामच होत असते.

गेल्या पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात १९ हजार ५७७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी, बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मंत्री तटकरे यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo