विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यूजीसीचे राजदूत बनण्याची संधी

आयोगाकडून याबाबत देशातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले आहे. त्याबाबतची माहिती सहा जूनपर्यंत आयोगाकडे सादर करावी लागणार आहे.

विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यूजीसीचे राजदूत बनण्याची संधी
NEP SAARTHI

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP 2020) उच्च शिक्षणविषयक तरतुदी, शिफारशींचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) एनईपी सारथी (NEP SAARTHI) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थ्यांची सारथी म्हणून निवड केली जाणार आहे. हे विद्यार्थी विद्यार्थी राजदूत (Student Ambassador) म्हणून काम करतील, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Student Ambassador for Academic Reforms in Transformning Higher Education in India)

आयोगाकडून याबाबत देशातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले आहे. त्याबाबतची माहिती सहा जूनपर्यंत आयोगाकडे सादर करावी लागणार आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये एनईपीच्या माध्यमातून अनेक सुधारणा होणार आहे. त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा, समानता आणि उपलब्धता यावर अधिक भर आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी यांचा एकत्रित तितकाच आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील ७१ जण होणार IAS, IPS; रँकसह त्यांची नावे इथे वाचा

प्रामुख्याने या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून उच्च शिक्षणातील विविध सुधारणांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी यूजीसीकडून एनईपी सारथी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, धोरणाचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक संस्थेतील तीन विद्यार्थी सारथी म्हणून निवड केली जाणार आहे. हे विद्यार्थी एनईपीसाठी युजीसीचे राजदूत म्हणून काम करतील.

यूजीसीने सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना पत्र पाठवून संस्थेतील कोणत्याही शाखेतील तीन विद्यार्थ्यींची निवड करण्यास सांगितले आहे. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चांगले असले पाहिजे. उत्कृष्ट संवाद कौशल्य, नेतृत्वगुण असे गुण संबंधित विद्यार्थ्यांमध्ये असावेत, असे आयोगाने सांगितले आहे. या विद्यार्थ्यांची माहिती सहा जूनपर्यंत युजीसीकडे पाठवावी लागणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2