प्रियदर्शनी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी एसआरपीएफ प्रि- स्कूलचा उद्घाटन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला.

प्रियदर्शनी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि शैक्षणिक गुणवत्ता जपणाऱ्या प्रियदर्शनी स्कूलच्या माध्यमातून शिवाजीनगर येथील पुणे शहर पोलीस मुख्यालय परिसरातील शाळा चालवली जाते. आता हडपसर येथील 'राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ पुणे' यांच्या परिसरातील (एसआरपीएफ) पूर्व प्राथमिक शाळा चालवण्याचा मानही प्रियदर्शनी स्कूलला मिळाला आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
              राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रियदर्शनी एसआरपीएफ प्रि- स्कूलचा उद्घाटन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, स्मादेशक गट क्र.१ शैलेश बलकवडे , समादेशक गट क्र. १६ संदीप दिवाण , समादेशक गट क्र. २ नम्रता पाटील, सहा.समा.दिलीप तावरे , वैजनाथ चव्हाण व प्र. समा.सहा. विकास पाटील, प्रियदर्शनी स्कूलचे विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंह, जितेंद्र सिंह,  महेंद्र  सिंह,  सरिता सिंह , नरेंद्र सिंह, पूजा सिंह, डॉ.गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
       शाळेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रियदर्शनी स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह यांनी शाळेबद्दल माहिती दिली. यावेळी चिरंजीव प्रसाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अर्पिता दीक्षित यांनी केले.