Talathi Bharti : पेपर डाऊनलोड करण्यासाठी लॅपटॉप थेट परीक्षा केंद्राबाहेर, विद्यार्थ्यांकडून आक्षेप

संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी भरतीत असाच अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे परीक्षांना त्वरित स्थगिती द्यावी, अशी आमची समितीने पुन्हा एकदा केली आहे.

Talathi Bharti : पेपर डाऊनलोड करण्यासाठी लॅपटॉप थेट परीक्षा केंद्राबाहेर, विद्यार्थ्यांकडून आक्षेप
Talathi Bharti 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात सुरू असलेली तलाठी भरती (Talathi Bharti) आणि वाद हे आता जणू समीकरण बनले आहे. दररोज काही ना काही घोळ समोर येत आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटी (Paper Leak) तर सोमवारी सर्व्हर डाऊनच्या गोंधळ. आता तर एका परीक्षा केंद्रातील (Exam Centre) कर्मचारी पेपर डाऊनलोड करण्यासाठी थेट परीक्षा केंद्राबाहेर लॅपटॉप (Laptop) घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली आहे. (Maharashtra Talathi Recruitment News)

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून वर्ध्यातील एका परीक्षा केंद्रातील व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी भरतीत असाच अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे परीक्षांना त्वरित स्थगिती द्यावी, अशी आमची समितीने पुन्हा एकदा केली आहे. वर्ध्यातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्राचा मालक/कर्मचारी परीक्षा सुरू असताना लॅपटॉप घेऊन केंद्राबाहेर गेला आणि परत आत आल्याचे समितीने म्हटले आहे.

Talathi Bharti : विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल शासनाने व्यक्त केली दिलगिरी

उमेदवारांनी हरकत घेतल्यावर, आत मोबाईल जॅमर कार्यान्वित असल्याने नेटवर्क काम करत नसल्याने मी बाहेर पेपर डाऊनलोड करण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर कर्मचाऱ्याने दिल्याचा दावा समितीने केला आहे. आजवर आम्ही इतके पेपर दिले पण आम्हाला कधी कोणीही लॅपटॉप बाहेर घेऊन जाताना दिसले नाही, यातील टेक्निकल गोष्टी माहिती नसल्या तरी पेपर सरळ लॉगिन मधे उपलब्ध होत असतो, असे समितीने म्हटले आहे.

जर कर्मचाऱ्याने पेपर बाहेर डाउनलोड केला असेल तर त्याने बाहेरच्या-बाहेर कोणाला पाठविला नसेल कशावरून?, अशी शंका समितीने उपस्थित केली आहे. तानिया कॉम्पुटर लॅब, अनमोल नगर, चिराग  कॉम्प्लेक्स स्टेट बँक शेजारी, वर्धा असे परीक्षा केंद्राचे नाव असून संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी भरतीत असाच अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे परीक्षांना त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo