ABVP आक्रमक; शिवाजी विद्यापीठातील परीक्षेच्या गोंधळाविरोधात आंदोलन

निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा परिषदेकडून परिक्षा विभागाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.

ABVP आक्रमक; शिवाजी विद्यापीठातील परीक्षेच्या गोंधळाविरोधात आंदोलन
ABVP Protest

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) वर्ष २०२२-२३ च्या सत्र परीक्षांचे निकाल लागायला मागील काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पण अनेक विषयाचे पेपर फुटल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) परीक्षा विभागाला धारेवर धरले होते. यानंतर आता मागील काळात झालेल्या परीक्षांचे निकाल (Examination Result) लागण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा परिषदेकडून परिक्षा विभागाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://www.eduvarta.com/

विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे गुण प्राप्त करूनही अनुत्तीर्ण दाखवणे, गुणांच्या जागी *, #, ? असे चिन्ह दाखवणे, पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करूनही पात्रता पूर्ण नाही असे दाखवणे अशाप्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांना येत असल्याचा दावा परिषदेने केला आहे. परिषदेने विद्यापीठ प्रशासनाला नुकतेच निवेदनही दिले होते. त्यानंतरही प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप करत परिषदेकडून सोमवारी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.

परिक्षांमध्ये वारंवार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून गोंधळ निर्माण केला जात आहे. त्याला जबाबदार असणाऱ्या परीक्षा नियंत्रक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी अभाविपकडून करण्यात आली. जोपर्यंत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे व परीक्षा नियंत्रण ए. एन. जाधव आले.

हेही वाचा : SPPU : विद्यापीठाचा पंचवार्षिक आराखडा तयार होतोय, तुम्हीही करा सुचना

अनेक विषयात विद्यापीठ प्रशासनाकडून हलगर्जीपणा आढळून झाल्याचे आढळून आले. विद्यार्थ्यांना आलेल्या सर्व समस्यांचे लेखी तक्रार अर्ज परीक्षा नियंत्रकाकडे जमा करण्यात आले. जर विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल पुढील सात दिवसांमध्ये लागले नाहीत, तर परीक्षा नियंत्रकांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला. यावेळी अभाविपचे सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, प्रसाद लष्कर, स्वप्निल पाटील, पंकज जत्ते, शिवतेज शेटे, श्रीनाथ साळुंखे आदी कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.