CBSE Board Exam :  पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर, १७ जुलैपासून सुरूवात

CBSE ची प्रात्यक्षिकक परीक्षा ६ ते २० जुलै दरम्यान होणार आहे. नियमित उमेदवारांच्या प्रात्यक्षिक परीक्षा त्यांच्या संबंधित शाळांमध्ये घेतल्या जातील.

CBSE Board Exam :  पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर, १७ जुलैपासून सुरूवात
CBSE Supplementary Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने पुरवणी परीक्षेच्या 2023 च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा ऑनलाईन जाहीर केल्या आहेत. CBSE १० वी आणि १२ वी ची पुरवणी परीक्षा १७ जुलै पासून सुरु होणार आहेत. CBSE च्या www.cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. (CBSE Supplementary Examination)

संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, CBSE ची प्रात्यक्षिकक परीक्षा ६ ते २० जुलै दरम्यान होणार आहे. नियमित उमेदवारांच्या प्रात्यक्षिक परीक्षा त्यांच्या संबंधित शाळांमध्ये घेतल्या जातील. तर खाजगी उमेदवारांच्या  परीक्षा या परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्पन्नाचा दाखला, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र नसले तरी मिळेल अकरावीत प्रवेश

प्रात्यक्षिक परीक्षेत बसण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या निकाल/मार्कशीट आणि प्रवेशपत्राच्या प्रतीसह ६ जुलै २०२३ पूर्वी त्यांच्या शाळा किंवा परीक्षा केंद्रांशी संपर्क साधावा, अशी सूचना CBSE कडून देण्यात आली आहे.

CBSE १० वी, १२ वी ची लेखी परीक्षा १७ जुलै पासून सुरु होणार आहे. परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे, असल्याचे 'सीबीएसई'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2