आयटी पार्कला महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा; अजित पवारांचे निर्देश

पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली.

आयटी पार्कला महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा; अजित पवारांचे निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोल्हापुरात (Kolhapur) संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क (IT Park) उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (Mahatma Phule Agricultural University) ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांनी गुरूवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देशही पवारांनी दिले.

 

पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर लगेच भरा अर्ज; उद्या शेवटची मुदत

 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्क साठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 

आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे, असे पवार यांनी सांगितले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k