SSC Result : शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचा डंका;  दिक्षा नरवाडे राज्यात प्रथम

समाज कल्याण विभागाच्या राज्यातील ९०  निवासी  शाळेतुन मार्च २०२३ मध्ये २ हजार ३८६ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी २ हजार ३१९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

SSC Result : शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचा डंका;  दिक्षा नरवाडे राज्यात प्रथम
Residential Schools In Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात समाज कल्याण विभागामार्फत (Social Justice Department) चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील (Residential Schools in Maharashtra) मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) घवघवीत यश मिळवले आहे. राज्यातील ९० निवासी शाळांपैकी ६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच २१ शाळांचा निकाल  ९० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. (SSC Result News)

समाज कल्याण विभागाच्या राज्यातील ९०  निवासी  शाळेतुन मार्च २०२३ मध्ये २ हजार ३८६ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी २ हजार ३१९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. राज्यातील निवासी शाळांचा निकाल हा सरासरी ९७.१९ टक्के इतका लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शासकिय निवासी शाळा महागांव येथील विद्यार्थीनी दिक्षा विनोद नरवाडे ही ९४.६० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम आली आहे.

SSC Exam : पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज भरता येणार; राज्य मंडळाची माहिती

विद्यार्थ्यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. समाज कल्याण विभागाच्या राज्यातील निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यातुन शाळांची गुणवत्ता वाढ होण्यास मदत झाली आहे, असे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. 

11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...

दरम्यान, निवासी शाळांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते दहावी विनामूल्य शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येते. समाज कल्याण विभागाची ही महत्त्वाची योजना असून यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. चालु शैक्षणिक वर्षाचे प्रवेश प्रकिया सुरू झाली असुन विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo