NIRF रँकिंगमध्ये मोठ्या घसरणीवर कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची पहिली प्रतिक्रिया...दोन बाबींकडे वेधले लक्ष

मागील वर्षीच्या नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (NIRF 2023) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ बाराव्या स्थानावर तर सर्वसाधारण यादीत २५ व्या क्रमांकावर होते.

NIRF रँकिंगमध्ये मोठ्या घसरणीवर कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची पहिली प्रतिक्रिया...दोन बाबींकडे वेधले लक्ष
SPPU Vice Chancellor Dr, Karbhari Kale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या (Educational Institutes) क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ओव्हरऑल रँकिंगमध्ये ३५ व्या तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. त्यावरून आता विद्यापीठाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Dr. Karbhari Kale) यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना विद्यापीठाचे रँकिंग (NIRF 2023) कमी झाले असले तरी मिळालेले गुण कायम असल्याचे सांगितले. (Savitribai Phule Pune University National Intitutional Ranking Framework 2023)

मागील वर्षीच्या नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (NIRF 2023) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ बाराव्या स्थानावर तर सर्वसाधारण यादीत २५ व्या क्रमांकावर होते. याबाबत 'एज्युवार्ता'शी बोलताना डॉ. काळे म्हणाले, विद्यापीठाचा क्रमांक क्रमवारीमध्ये खाली गेला असला तरी गुण कायम ठेवले आहेत. संशोधन आणि परसेप्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. संशोधनाबाबत आराखडा तयार केला जात आहे.

NIRF 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण; देशात ३५ व्या क्रमांकावर

संशोधनासाठी प्राध्यापकांची आवश्यकता आहे, याकडे डॉ. काळे यांनी लक्ष वेधले. निवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागा रिक्त राहत आहेत. शासनाकडून प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू असली तरी पूर्ण झालेली नाही. प्राध्यापकांच्या संशोधनामुळेच रँकिंगमध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील वर्षी विद्यापीठ ओव्हरऑल गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात पहिल्या दहामध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे,असे असले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. 

विद्येच्या माहेरघरातील संस्थाच NIRF रँकिंगमध्ये पिछाडीवर; पुण्यातील टॉप कॉलेज पाहा एका क्लिकवर...

मागील तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठाची क्रमवारी दरवर्षी घसरत चालली आहे. विद्यापीठ गटात २०२० मध्ये नऊ क्रमांकावर असलेले विद्यापीठ मागीलवर्षी १२ व्या क्रमांकावर होते. तर २०२१ मध्ये अकरावे स्थान मिळाले होते. त्यावेळी एकूण ५८.३४ एवढे होते. विद्यापीठांच्या गटात पुणे विद्यापीठ महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर घसरले आहे. मागील वर्षी विद्यापीठ राज्यात पहिले होते. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo