11th Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरूवारपासून, प्रतिबंधित विद्यार्थीही फेरीसाठी पात्र

दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेले, प्रवेश फेरी दोनमध्ये प्रथम पसंतीरम मिळालेले (प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले) विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित असतील.

11th Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरूवारपासून, प्रतिबंधित विद्यार्थीही फेरीसाठी पात्र
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाने (Education Department) इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (11th Admission Online Process) तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. ६ जुलैपासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच दुसऱ्या फेरीमध्ये प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये पसंतीक्रम अर्ज भाग दोन लॉक करून सहभागी होता येणार आहे. (11th Admission Timetable)

तिसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील, अन्यथा त्यांचे मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेले, प्रवेश फेरी दोनमध्ये प्रथम पसंतीरम मिळालेले (प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले) विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित असतील. या फेरीत अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील.

मंत्री महोदय, मुलांना तरी खोटे आश्वासन देऊ नका; मंत्री केसरकरांवर आपची टीका

ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील का नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल. प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील.

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

दि. ६ ते ९ जुलै – प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी अर्ज भाग एक भरू शकतात. अर्ज भाग एकमध्ये दुरूस्ती करता येईल, कोटा व द्विलक्षी प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोदविता येईल.

दि. १० व ११ जुलै – पात्र उमेदवारांची यादी करणे तसेच विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्व परीक्षण.

दि. १२ जुलै – निवड यादी प्रसिध्द करणे.

दि. १२ ते १४ जुलै – कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे.

दि. १४ जुलै – पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD