11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...

आठ जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते १२ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. त्यामुळे किमान एक व कमाल १० पसंतीक्रम म्हणजे विद्यालयांची नावे देणे अनिवार्य आहे.

11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) लागल्यामुळे आता सर्व विद्यार्थी पालकांना अकरावी प्रवेशाचे (11th Admission) वेध लागले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश अर्जाचा पहिला भाग (11th Admission Part one) बहुतेकांनी भरला असेल. तर दुसरा भाग ((11th Admission Part two) आठ जूनपासून भरता येणार आहे. या भाग भरताना विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. त्यातील पहिला पसंतीक्रम अत्यंत काळजीपूर्वक भरा. या पसंतीक्रमानुसार संबंधित महाविद्यालयासाठी (Junior Colleges) निवडयादीत नाव आल्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही. तिथे प्रवेश घेतला नाही, तर तुम्हाला पुढील प्रवेश फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. त्यामुळे तुमच्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते. (11th Admission Process Timetable)

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हरुन आतार यांनी शनिवारी इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आठ जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते १२ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. त्यामुळे किमान एक व कमाल १० पसंतीक्रम म्हणजे विद्यालयांची नावे देणे अनिवार्य आहे. त्यानुसार गुणवत्तेच्या आधारे निवड यादी जाहीर केली जाणार आहे.

11th Admission : अकरावीचे 'कोटा अंतर्गत' दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

CAP व QUOTA प्रवेशाद्वारे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व घटकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार विहित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील. तपशीलवार वेळापत्रक त्यानंतर घोषित केले जाईल, असे आवाहन आतार यांनी केले आहे.

CAP प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (नियमित फेरी १)

दि. ८ जून (स. १०) ते १२ जून (रा. १० पर्यंत) :

१. प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, म्हणजे नियमित फेरी-१ साठी पसंती अर्ज भाग-२ ऑनलाईन सादर करणे. विद्यार्थ्यांना भाग-२ मध्ये किमान एक व कमाल १० पसंतीक्रम / विद्यालये नोदविता येतील. (विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-२ मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी विद्यालय मिळेल / अलॉटमेंट केले जाईल) विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी त्यांचा फॉर्म भाग-२ लॉक करावा.

२. यासोबतच विद्यार्थी, कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. (Apply for Quota) (कोटा प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे दिले आहे.)

टीप- केवळ भाग-१ पडताळणी झालेले विद्यार्थी भाग-२ भरू शकतात.

३. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज भाग-१ भरून तो प्रमाणित करुन घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज भाग-१ मध्ये दुरुस्ती करता येईल, फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील.

४. विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रांद्वारे प्रमाणित करणे सुरु असेल. विद्यार्थ्यांना अंतिम तारखेपूर्वी त्यांचा अर्ज भाग-१ प्रामाणित करून भाग-२ भरता येईल.

५. नव्याने भरलेला अथवा दुरुस्त करुन भाग-१ प्रमाणित केलेले विद्यार्थी लगेच भाग-२ भरु शकतात.

SSC Result : पुरवणी परीक्षा, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचे घरबसल्या भरा अर्ज; इथे वाचा सविस्तर माहिती

दि. १२ जून प्रवेश अर्ज भाग-१ सायं. ४ वाजेपर्यंत भरता येईल, मार्गदर्शन केंद्रांकडील सर्व अर्ज सायं. ०६:०० वा पर्यंत प्रमाणित होतील.

दि. १३ जून (स. १०) ते दि. १५ जून (सायं. ६ पर्यंत) :

भाग-१ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे.

१. गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी तपशीलामध्ये काही दुरुत्या (असल्यास) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हरकती नोंदविणे. (विद्यार्थी लॉगीन मध्ये "ग्रीव्हन्स टूल" द्वारे)

२. संबंधित शिक्षण उपसंचालकांनी गुणवत्ता यादी दुरुस्तीबाबत हरकतींचे ऑनलाईन निराकरण करणे. दि. १५ जून (रात्री १० पर्यंत) :

३. या फेरीसाठी पसंतीक्रम भाग-२ अर्ज भरणे रात्री १० वाजता बंद होईल.

४. रात्री १० पर्यंत संबंधित शिक्षण उपसंचालकांनी हरकती / दुरुस्तीबाबत निराकरण कार्यवाही पूर्ण करणे.

टीप - फक्त पसंतीक्रम भाग-२ लॉक असलेले अर्ज अलॉटमेंटसाठी विचारात घेतले जातील.

दि. १६ ते १८ जून DATA PROCESSING (अंतर्गत कार्यवाही) - पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे. तसेच विभागीय CAP समित्यांकडून Allotment चे पूर्व परीक्षण.

दि. १९ जून (स. १०) :

१. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे.

२. विद्यार्थी लॉगीन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.

३. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे.

४. फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश/SMS देणे)

दि. १९ जून (स. १०) ते दि. २२ जून (सायं. ६ पर्यंत) :

५. अलॉट झालेल्या उमावि/कमवि मध्ये आपला प्रवेश निश्चित करणे, (प्रवेशास जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे). विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत मिळालेल्या विद्यालयास भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. (वेळापत्रकाप्रमाणे)

६. अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करुन आपला प्रवेश तेथे निश्चित करावा.

७. जर अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील.

८. कॉलेज लॉगीन मध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे. प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरु राहतील.

९. पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग-१ भरणे सुरू राहील. (या कालावधीत फॉर्म बदल / दुरुस्ती करता येणार नाही)

टीप : १. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिनमध्ये (Proceed for Admission) वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावा आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

२. जर एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे. त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.

३. जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा/तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

दि. २२ जून (रात्री ८ पर्यंत) :

  • प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ.
  • उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे समर्पित करण्यासाठी वेळ. (व्यवस्थापन कोटा आणि इनहाऊस कोटा)

दि. २३ जून : नियमित फेरी-२ साठी रिक्त जागा जाहीर करणे. (CAP व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असेल.)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo