ABVP : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत ‘अभाविप’चा मोठा विजय

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी तुषार देढा, सचिवपदी अपराजिता आणि सहसचिवपदी सचिन बैसला हे अभाविपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

ABVP : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत ‘अभाविप’चा मोठा विजय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

यंदा सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांचे विशेष लक्ष लागलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) निवडणुकांचा (Election) निकाल जाहीर झाला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) च्या उमेदवारांनी चार पैकी  तीन जागांवर विजय मिळवला आहे. २०१९ नंतर यावर्षी २०२३ मध्ये विद्यापीठात पुन्हा निवडणुका घेण्यात आल्यामुळे आणि दिल्लीतील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे यंदा ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती.

 

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी तुषार देढा, सचिवपदी अपराजिता आणि सहसचिवपदी सचिन बैसला हे अभाविपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसप्रणित NSUI चे अभि दहिया विजयी झाले आहेत. दहिया यांना २२ हजार ३३१ मते मिळाली आहेत. तर  तुषार देढा यांना २३ हजार ४६०  मते मिळाली आहेत.

सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी; पुण्यात ठरली रणनीती

दिल्ली विद्यापीठाच्या  विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या पदांसाठी २४ उमेदवार रिंगणात होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), काँग्रेसशी संलग्न नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), CPI(M) -समर्थित स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि CPI-ML (लिबरेशन) संलग्न ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) यांनी चारही पदांसाठी उमेदवार उभे केले होते. यामध्ये अभाविपने बाजी मारली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j