Promise to Protect : तंबाखूमुक्त भारतासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मोहीम

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून डिजिटल कॉन्फरन्समध्ये "प्रॉमिस टू प्रोटेक्ट" ही नवीन मोहीम सुरु करण्यात आली आहे.

Promise to Protect : तंबाखूमुक्त भारतासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मोहीम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशातील तरुण पिढीमध्ये वाढती व्यसनाधिनता, तंबाखूमुळे वाढणारे आजार रोखण्यासाठी तंबाखूमुक्त भारत (Tobacco free India) घडवण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Education Minisrty) शालेय शिक्षण (School Education) आणि साक्षरता विभागाच्या वतीने 'प्रॉमिस टू प्रोटेक्ट' (Promise to Protect) या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. तंबाखूमुक्त भारतासाठी 'प्रॉमिस टू प्रोटेक्ट' प्रतिज्ञा घेण्यासाठी देशभरातून एक हजार शाळातील शिक्षकांना एकत्र आणण्यात आले आहे. 

 

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून डिजिटल कॉन्फरन्समध्ये "प्रॉमिस टू प्रोटेक्ट" ही नवीन मोहीम सुरु करण्यात आली आहे. यावेळी सुमारे १ हजार शिक्षकांनी विद्यार्थी आणि तरुणांना तंबाखूच्या व्यसनापासून संरक्षण आणि त्यांच्या शाळा तंबाखूमुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा दिली.

कशा थांबवणार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या? केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्वे

 

प्रॉमिस टू प्रोटेक्ट ही एक डिजिटल मोहीम आहे, ज्याचा उद्देश तंबाखूच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना तंबाखूचा वापर सुरू करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे आहे. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने ही मोहीम भारतातील सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करते. ही मोहीम देशभरात राबवण्यात येणार आहे.

 

दरम्यान, 'ग्लोबल यूथ टोबॅको' च्या वतीने एक धक्कादायक सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार, भारतात ३८ टक्के सिगारेट ओढणारे, ४७ टक्के विडी ओढणारे आणि ५२ टक्के तंबाखूचे सेवन करणारे लोक त्यांच्या वयाच्या १० वर्षाआधीच या व्यसनाला सुरुवात करतात. तर जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण २०१६-१७ नुसार, भारतात दररोज सुमारे ६ लाख २५ हजार ही १० ते १४ वयोगटातील मुले तंबाखूचे सेवन करतात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k