बीबीए , बीसीए सीईटी पुन्‍हा घेण्याची अफवा; सीईटी सेलकडून परिपत्रक प्रसिध्द

विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने पुन्‍हा एकदा सीईटी घेतली जाणार असल्‍याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू होती. मात्र, अशी असा कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याचे स्पष्टीकारण सीईटी सेलतर्फे देण्यात आले आहे.

बीबीए , बीसीए सीईटी पुन्‍हा घेण्याची अफवा; सीईटी सेलकडून परिपत्रक प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीबीएम (BBM) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी यावर्षांपासून सीईटी परीक्षा घेण्यात आली. मात्र, आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने पुन्‍हा एकदा सीईटी (Once again CET) घेतली जाणार असल्‍याची अफवा समाजमाध्यमांवर फिरत आहे.मात्र,त्यावर सीईटी सेलने अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. 

राज्यातील महाविद्यालयांना याबाबत तोंडी माहिती (Verbal information to colleges) देण्यात आली असल्याची चर्चा शिक्षण वार्तूळात केली जात होती. त्यावर परिपत्रक काढले जाईल,असेही बोलले जात होते. परंतु, त्यावर सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना (vocational courses) सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. बहुतांश सीईटी परीक्षा पार पडलेल्‍या असून, अनेक परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहे.    

बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमाची सीईटी पार पडलेली असून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. परंतु, अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने येत्या 20 व 21 जून रोजी परीक्षा घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.त्याला सीईटी सेलने पूर्णविराम दिला आहे.