मोठी बातमी : इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली.

मोठी बातमी : इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर होणार
HSC Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC Board) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल (HSC Result) उद्या (गुरूवारी) जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. त्यामुळे मागील काही दिवसांपासून असलेली निकालाची प्रतिक्षा संपली आहे. (HSC result will be announced on Thursday)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

हे ही वाचा HSC Result : गुणपत्रिकेसाठी दहा दिवस थांबावे लागणार, सोमवारपासून भरा पुरवणी परीक्षेचे अर्ज

अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे -

१. mahresult.nic.in

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th result-2023

६. http://mh12.abpmajha.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्याल्यांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2