मान्सूनची हजेरी! मुलांना शाळेत पाठवताना काय घ्याल काळजी?

लहान मुलांमध्ये मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे  ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा जास्त फटका लहान मुलांना बसतो.

मान्सूनची हजेरी! मुलांना शाळेत पाठवताना काय घ्याल काळजी?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उन्हाळ्याच्या सुट्टीत (Summer Vacation) भरपूर खेळ आणि आराम घेतल्यानंतर आता मुले परत शाळेत जाऊ लागली आहेत. पण शाळा सुरु होताच पावसाळा (Monsoon) ही सुरु होतो. अशा वेळेस मुलांना शाळेत (School Students) पाठवताना विशेष म्हणजे लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी (Parents) कोणती काळजी घ्यावी,  याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना लाटकर (Dr. Archana Latkar) यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला.

डॉ. लाटकर म्हणाल्या, "या वातावरणात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे पचनशक्ती मंदावते. लहान मुलांमध्ये मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे  ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा जास्त फटका लहान मुलांना बसतो.शाळेत जाणाऱ्या मुलांचा बाहेरच्या वातावरणाशी थेट संपर्क जास्त येतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

शाळा सुरु झाल्या, मुलांना डब्यात काय द्यायचे? बाल आहार तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

पावसाळ्यात मुलांना सर्दी - खोकल्याचा त्रास जास्त होत असतो. या गोष्टी टाळण्यासाठी  मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून त्यांना जीवनसत्त्व 'सी' असलेला आहार देत राहावे. जीवनसत्व 'सी' करिता मोसंबी, संत्री, लिंबू, आवळा ही फळे मुलांना द्यावीत. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचा खूप तेलकट आणि ओलसर होते. त्यामुळे त्वचेवर धूळ आणि बॅक्टेरिया सहज चिकटतात. परिणामी स्किन फंगल इंफेक्शनला बळी पडते. ऍथलीट्स फूट, फंगल रिंगवॉर्म, फंगल नेल इन्फेक्शन ही त्वचेशी निगडीत काही फंगल इंफेक्शन या काळात जास्त होतात, अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी योग्य स्वच्छता ठेवा. मुलांना ओले कपडे अजिबात घालू देऊ नका. शरीर शक्य तितके स्वच्छ आणि कोरडे ठेवा, असे डॉ. लाटकर यांनी सांगितले.

तुमच्या मुलांना 'गुड टच -बॅड टच' विषयी सांगितलंय का? मग या गोष्टी माहिती हव्यातच...

आपले टॉवेल, कपडे कोणाशीही शेअर करू नका, मुलांचे शाळेचे गणवेश, मोजे  किमान दिवसाआड बदला. लहान मुलांची अंतर्वस्त्रे कोरडी आणि स्वच्छ असतील याकडे विशेष लक्ष द्या. नाहीतर फंगल इंफेक्शन होऊ शकते. पावसाळ्यात मुलांना फळे, भाज्या, दूध, नट्स नियमितपणे द्या. मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलांना पूर्ण कपडे घाला, जेणेकरून डास किंवा किडे चावू शकणार नाहीत, मुलांना स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला, त्यांना बाहेरचे जंक फूड खाऊ देऊ नका, या काळात शक्यतो गरम पाण्याने मुलांचे हात पाय वारंवार धुवा, असा सल्लाही लाटकर यांनी दिला. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2