आता सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य-L1' झेपावणार; पुण्यातील 'आयुका'ची मोठी भूमिका

'आदित्य-L1' अंतराळयान सूर्याभोवतीच्या तेजोमंडल आणि प्रभामंडळाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 'आदित्य-L1' डिजाईन करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'आयुका' या संस्थेची मोठी भूमिका आहे.

आता सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य-L1' झेपावणार; पुण्यातील 'आयुका'ची मोठी भूमिका
Aditya L1 ISRO

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चंद्र मोहिमेच्या (Chandrayaan 3) यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सूर्याचा (Sun) अभ्यास करण्यासाठी तयार झाली आहे. यासाठी २ सप्टेंबर रोजी 'आदित्य-L1' (Aditya L1) चे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. 'आदित्य-L1' अंतराळयान सूर्याभोवतीच्या तेजोमंडल आणि प्रभामंडळाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 'आदित्य-L1' डिजाईन करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'आयुका' (IUCAA) या संस्थेची मोठी भूमिका आहे.

इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थेने या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे. तर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अस्ट्रोफिजिक्स (IIA) या संस्थेने दृश्य उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ पेलोड विकसित केले आहे.

देशात सुरु झाली पहिली AI शाळा; विद्यार्थ्यांना मिळणार अद्ययावत ज्ञान

आदित्य-L1 अल्ट्राव्हायोलेट पेलोडचा वापर करून आणि एक्स-रे पेलोड वापरून फ्लेअर्सचे निरीक्षण करून कोरोना आणि सौर क्रोमोस्फियरची माहिती देऊ शकते. पार्टिकल डिटेक्टर आणि मॅग्नेटोमीटर पेलोड चार्ज केलेले कण आणि L-1 च्या आसपासच्या बाह्य कक्षेत पोहोचणारे चुंबकीय क्षेत्र याबद्दल माहिती देऊ शकतात.

हे अंतराळ यान बेंगळुरू येथील यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार करण्यात आले असून ते १४ ऑगस्ट रोजी  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेस पोर्टवर पोहोचवण्यात आले आहे. इस्रो कडून समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्य-L1 चे प्रक्षेपण २ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. हे यान सूर्य-पृथ्वी प्रणालीमध्ये L1 भोवतीच्या बाह्य कक्षेत ठेवण्याची योजना आहे.

ISRO ने म्हटले आहे की, L1 बिंदूभोवती बाह्य कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाचा सूर्यग्रहण पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. तसेच यामुळे वास्तविक वेळेत सौर क्रियाकलापांचे निरीक्षण करणे आणि अवकाशातील हवामानावर त्याचा परिणाम याचाही अभ्यास करता येईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo