SPPU News : पदवी प्रदान समारंभ १ जुलैला; सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियमित पदवी प्रदान समारंभ राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत येत्या १ जुलै २०२३ रोजी पार पडणार आहे.

SPPU News : पदवी प्रदान समारंभ १ जुलैला; सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र
Savitribai Phule Pune University Graduation Ceremony

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (SPPU) १२२ वा पदवी प्रदान (Graduation ceremoney) समारंभ येत्या १ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता विद्यापीठाच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाकडे एक लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियमित पदवी प्रदान समारंभ राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस (Governor Ramesh bais) यांच्या उपस्थितीत येत्या १ जुलै २०२३ रोजी पार पडणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करावे, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

पदवी प्रदान समारंभात सुवर्णपदक विजेता विद्यार्थी व काही निवडक पीएचडी धारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान वितरित केले जाणार असून इतर विद्यार्थ्यांना स्पीड पोस्टाच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र पाठविले जाणार आहेत.

विद्यापीठाकडे सर्वाधिक इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या ४० हजार ६८ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. तसेच वाणिज्य विज्ञान आणि व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची  विद्याशाखा निहाय संख्या
 
कला : १ हजार ६६७
वाणिज्य : २८ हजार ५००
शिक्षणशास्त्र : २ हजार १४०
अभियांत्रिकी : ४० हजार ६८
विधी : ३ हजार १९९
व्यवस्थापनशास्त्र : १० हजार ६०३
मेंटल मोरल : ६ हजार ९१९
फार्मसी : ४ हजार ६६३
फिजिकल एज्युकेशन : ८८
विज्ञान : २३ हजार ३१२
तंत्रज्ञान : ३९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo