IIT मद्रासमध्ये वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग सुरु

या अभ्यासक्रमात वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बीएस,डॉक्टरांसाठी पीएचडी प्रोग्राम, डॉक्टरांसाठी संशोधनाद्वारे एमएस,वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एमएस आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पीएचडी कार्यक्रमाचा समावेश आहे.

IIT मद्रासमध्ये वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग सुरु

IIt इन्स्टिटयूट मध्ये तंत्रज्ञानासोबतच वैद्यकीय विज्ञानाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा पायंडा IIT मद्रासने घातला आहे. बी.एस. वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच अभ्यासक्रम असणार आहे. 


IIT मद्रासने प्रसिध्द केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे, औषध शोध, औषधातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी तयार करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन देणार आहे. हा विभाग डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशिक्षित करेल .या उपक्रमाचा मुख्य उद्देश शास्त्रज्ञ आणि अभियंते यांना वैद्यकीय संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे.


संस्थेने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बीएस,डॉक्टरांसाठी पीएचडी प्रोग्राम, डॉक्टरांसाठी संशोधनाद्वारे एमएस,वैद्यकीय विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एमएस आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पीएचडी कार्यक्रमाचा समावेश आहे.