आपण बदलाच्या उंबरठ्यावर, शिक्षण हवे परवडणारे : आयआयटी मद्रासच्या संचालकांचे आवाहन

जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भारताची नियोजनबद्ध वाटचाल या विषयावर आधारित क्यूएस आय-गेजतर्फे आयोजित दुसऱ्या शैक्षणिक गुणवत्ता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आपण बदलाच्या उंबरठ्यावर, शिक्षण हवे परवडणारे : आयआयटी मद्रासच्या संचालकांचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय विद्यार्थ्यांचे (School Children) नोंदणी गुणोत्तर सुधारणे, आंतरविद्याशाखीय शिक्षण (Education) आणि संशोधन मानसिकता, उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचे आंतरराष्ट्रीयीकरण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्ही बदलाच्या उंबरठ्यावर आहोत म्हणूनच सर्वांसाठी शिक्षण सुलभ आणि परवडणारे बनवले पाहिजे, असे आवाहन आयआयटी मद्रासचे (IIT Mumbai) संचालक प्रा. डॉ. व्ही कामकोटी (Dr. V. Kamakoti) यांनी केले.

जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भारताची नियोजनबद्ध वाटचाल या विषयावर आधारित क्यूएस आय-गेजतर्फे आयोजित दुसऱ्या शैक्षणिक गुणवत्ता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, निम्सचे माजी कुलगुरू आणि एफआयसीसीआय एचइएलचे सल्लागार डॉ. राजन सक्सेना,  क्यूएस आय-गेजचे प्रादेशिक संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विन फर्नांडिस, क्यूएस आय-गेजचे कार्यकारी अधिकारी रवीन नायर उपस्थित होते.

भरती बातमी : सहकार विभागात भरती; सरळसेवेने ३०९ पदे भरणार, उद्यापासून करा अर्ज

प्रा. कामकोटी म्हणाले, “भारतातील शिक्षण व्यवस्थेतील भागधारकांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण व संशोधनाची मानसिकता जोपासणे आवश्यक आहे. त्यांनी उद्योजकता आणि नवकल्पनेला प्रोत्साहन देऊन अधिक नियोक्ते निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आयआयटी सारख्या संस्था व इतर भागधारकांनी ग्रामीण स्तरावर हस्तक्षेप करुन देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि परवडणारे शिक्षण बनवणे आवश्यक आहे.”

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “वैश्विक स्तरावर भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दर्जेदार शिक्षणाच्या शोधात आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल करणे मोठे काम आहे. सैद्धांतिकदृष्ट्या जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भारताची नियोजनबद्ध वाटचाल तयार करणे शक्य असले तरी, ही परिस्थिती-आधारित प्रणाली आहे. त्यासाठी आपल्याला डेटाबेसचे सांख्यिकीय मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

11th Admission : द्विलक्षी विषयांसाठीही आजपासून नोंदवा पसंती, एकाच विषयाला मिळेल प्रवेश

शिक्षणासाठी भारत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. अशा वेळेस जागतिक स्तरावर आपली संस्थात्मक प्रतिष्ठा सुधारण्याची गरज आहे. विद्याशाखा सक्षमता विकास, विद्यार्थी केंद्रितता, पीएचडी कार्यक्रमांसाठी निधी वाढविणे, डिजिटल तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा लाभ घेऊन जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहचलो तर येत्या दशकात आपल्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय सुधारणा करू शकू, असे डॉ. राजन सक्सेना यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD