NMMS Exam : जरेवाडी शाळेतील १७ विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये
मेरिट लिस्टमध्ये आलेल्या १७ विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल (NMMS Result) गुरूवारी जाहीर झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जरेवाडी शाळेतील (Jarewadi School) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. ही परीक्षा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.
शाळेतील १७ विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले असून इतर २८ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. मेरिट लिस्टमध्ये आलेल्या १७ विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
पृथ्वीराज पवार, तुषार शेळके, अभय गाडे, सार्थक शिंदे, ऋषिकेश पवार, सार्थक जायभाय, सार्थक बेदरे, सार्थक उंडे, कार्तिक दिवटे, कार्तिक डोंगर, पार्थ जायभाये, सत्यवान जावळे, सुशांत पवार, सिद्धी कोळपकर, दिपाली सानप, प्राची पाखरे, अनिशा जरे हे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले आहेत.
तसेच भक्ती पवार, आदिती उंडे ,मयुरी जाधव,प्रतीक्षा बेदरे, सानिका भिलारे, श्रेया गुजर, गायत्री पवार, दिव्या पवार, दीक्षा शिंदे, ऋतुजा पवार,प्रतीक्षा खामकर, प्रगती शेळके, स्नेहल पवार,मंगेश जरे, अभिषेक पवार,प्रथमेश भोगलं, प्रणव पवार, रोहन सुळे, रोहन पवार, प्रजीत घायाळ, वैभव पवार,मंथन येवले,ओम डांभे,यशराज पवार, श्रेयश जरे, नयन भिलारे, प्रतीक्षा डांभे, समर्थ पवार हे २८ विद्यार्थी शासकीय सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.