SKill Education : पिंपरी चिंचवड पालिका आणि सिम्बोयोसिस मुलींना देणार कौशल्य शिक्षण

पिंपरी चिंचवड महानगरपालिका या उपक्रमासाठी समाजातील वंचित घटकातील गरजू ५५ मुलींच्या प्रशिक्षणासाठी योगदान देणार आहे.

SKill Education : पिंपरी चिंचवड पालिका आणि सिम्बोयोसिस मुलींना देणार कौशल्य शिक्षण
MoU between PCMC and Symbiosis Skill University

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उत्पादन क्षेत्रात युवतींचा सहभाग वाढावा या उद्देशाने सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Symbiosis Skill University) किवळे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांच्यामध्ये नुकताच  सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. कौशल्य शिक्षणाला (Skill Education) प्राधान्य देत महिलांना कौशल्य शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या कराराअंतर्गत समाजातील गरजू  महिलांना कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) देण्यात येईल.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त अजय चारठणकर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि सिंबायोसिस कंसल्टंसी सर्व्हिसेसचे संचालक श्रवण कडवेकर यावेळी उपस्थित होते.

आपण बदलाच्या उंबरठ्यावर, शिक्षण हवे परवडणारे : आयआयटी मद्रासच्या संचालकांचे आवाहन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका या उपक्रमासाठी समाजातील वंचित घटकातील गरजू ५५ मुलींच्या प्रशिक्षणासाठी योगदान देणार आहे. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत  विद्यापीठाने मॅन्युफॅकचारिंग एक्सलेन्स आणि ऑटोमेशनमधील अभ्यासक्रम बनविला आहे. अभ्यासक्रमाचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवतींना पदविका प्रदान केली जाते. यामार्फ़त महिलांना   मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल, ऑटोकॉम्प यांसारख्या नानाविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते. हे प्रशिक्षण निवासी असून याचा कालावधी २ वर्षांचा आहे.

याविषयी बोलताना डॉ. मुजुमदार म्हणाल्या, महिला सक्षमीकरण हे साक्षरतेचे पहिले पाऊल आहे. हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच एक नवीन क्रांती घडवून आणेल. सिंबायोसिस नेहमीच नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीचा अवलंब करते अशा कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून त्या रोजगारक्षम बनतात. यामार्फत उद्योगांना देखील कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होत आहे.

11th Admission : द्विलक्षी विषयांसाठीही आजपासून नोंदवा पसंती, एकाच विषयाला मिळेल प्रवेश

सिंबायोसिस स्किल्स अँड युनिव्हर्सिटीतर्फे राबवण्यात येत असलेले  विविध कौशल्य प्रशिक्षणाचे उपक्रम हे अत्यंत कौतुकास्पद  आहे. सिंबायोसिस बरोबर आम्ही या आधीही उपक्रम राबविला होता आणि मला खात्री आहे ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल. या उपक्रमाअंतर्गत शिकण्याची जिद्द, आकांक्षा बाळगणाऱ्या महिला  ह्या  कुशल बनतील आणि त्यातून त्या सक्षम बनतील, असे शेखर सिंह यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD