भरती बातमी : सहकार विभागात भरती; सरळसेवेने ३०९ पदे भरणार, उद्यापासून करा अर्ज

पात्र उमेदवारांकडून सहकार विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दि. ७ ते २१ जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरती बातमी : सहकार विभागात भरती; सरळसेवेने ३०९ पदे भरणार, उद्यापासून करा अर्ज
Cooperative Department Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सहकार विभागाच्या (Cooperative Department) राज्यभरातील कार्यालयांत विविध पदांसाठी सरसेवेळने भरती (Recruitment) केली जाणार आहे. विभागीय सहनिबंधक, लेखापरिक्षक, सहकारी अधिकारी, वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक अशी सुमारे ३०९ पदे भरली जाणार आहेत. इच्छूकांना दि. ७ ते २१ जुलै यादरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. (Recruitment in Cooperative Department)

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील विविद पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरिक्षक श्रेणी-२ ही पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत.

PSI Result 2022 : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, १० हजार विद्यार्थी पात्र

पात्र उमेदवारांकडून सहकार विभागाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दि. ७ ते २१ जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल. या पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख सहकार विभागाच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.

भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात पाहण्यासाठी या लिंकवर क्लीक करा - https://sahakarayukta.maharashtra.gov.in//Site/Upload/Pdf/Jahirat-5072023.pdf

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD