शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो :  राहुल सोलापूरकर

शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो :  राहुल सोलापूरकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांनी आपल्या बालवयातच स्वतःमधील कलागुणांना ओळखून त्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःचा 'स्व'ओळखणे आवश्यक असते. स्वतःचा 'स्व' अशा शिबिरांच्या माध्यमातून शोधता येतो आणि या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो, असे मत सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

खडकी शिक्षण संस्था आयोजित उन्हाळी शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, इस्कॉन संस्थेचे प्रमुख संजय भोसले,  सचिव आनंद छाजेड, विश्वस्त रमेश अवस्थे, मधुकर टिळेकर, सुधीर फेंगसे, सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे, मुख्याध्यापिका ललिता काकडे, मुख्याध्यापक मोहन लोणकर, मुख्याध्यापिका शुभांगी बरेल्लू, डॉ गजानना आहेर जयश्री माकर आदी उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, संस्थेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि खडकी दापोडी बोपोडी या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामधून विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण आणि नाश्त्याची सोय देखील केलेली आहे.

या शिबिरामध्ये चित्रकला, नेमबाजी , वैज्ञानिक प्रयोग, रद्दीपासून कागद निर्मिती, संस्कृती कार्यक्रम, रेडिओ जॉकी प्रशिक्षण , हॉकी आणि फुटबॉल या खेळांचे देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरामध्ये २५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्था सचिव आनंद छाजेड यांनी केले. यावेळी प्रा. वैशाली वाघ, प्रा. झांबरे प्रा. महादेव रोकडे ,  बाबा गायकवाड , गिरीश ननावरे , स्वामी राज भिसे उपस्थित होते.