11th Admission : द्विलक्षी विषयांसाठीही आजपासून नोंदवा पसंती, एकाच विषयाला मिळेल प्रवेश

अकरावीला प्रवेश घेताना अनेक विद्यार्थी एक विषय हा द्विलक्षी म्हणजेच व्यावसायिक विषय निवडतात. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना या विषयांसाठी संबंधित महाविद्यालयांसाठी पसंती नोंदविता येते.

11th Admission : द्विलक्षी विषयांसाठीही आजपासून नोंदवा पसंती, एकाच विषयाला मिळेल प्रवेश
11th Admission Bifical Subjects

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची (11th Admission Online Process) तिसरी नियमित फेरी आजपासून सुरू होत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. शिक्षण विभागाने द्विलक्षी अभ्यासक्रमांची (Bifocal Admission) प्रवेशप्रक्रिया या फेरीपासून सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी विषयांसाठी पसंती नोंदविता येणार आहे. (Apply for Bifocal)

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक व अमरावती या शहरांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. अकरावीला प्रवेश घेताना अनेक विद्यार्थी एक विषय हा द्विलक्षी म्हणजेच व्यावसायिक विषय निवडतात. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना या विषयांसाठी संबंधित महाविद्यालयांसाठी पसंती नोंदविता येते.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून प्राचार्याला चोप; मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरा, जबरदस्तीने ख्रिस्ती शिक्षण दिल्याचा आरोप

याअनुषंगाने शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहे. त्यानुसार, द्विलक्षी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी प्रवेशित विद्यार्थी यांनी आपल्या लॉगीन मधून ऑनलाईन पसंती नोंदविणे आवश्यक आहे. विद्यालयांकडून द्विलक्षी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्या विषयनिहाय गुणवत्ता याद्या तयार केल्या जातील. आणि निवड याद्या विद्यालयामध्ये प्रदर्शित केल्या जातील. विषय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेश दिलेल्या वेळेत कनिष्ठ महाविद्यालयांनी निश्चित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण प्रवेश प्रक्रियेतून (CAP or QUOTA) प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना त्या कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित शाखा/तुकडीसाठी उपलब्ध असलेल्या द्विलक्षी विषय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. एक अथवा अनेक विषयासाठी अर्ज करता येईल तथापि प्रवेश एकाच विषयासाठी घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी एकदा दिलेले पसंतीक्रम कायम राहतील तथापि विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी त्यामध्ये बदल करता येईल.

11th Admission : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरूवारपासून, प्रतिबंधित विद्यार्थीही फेरीसाठी पात्र

नियमित फेरी-३ वेळी प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला (Appls Bifocal) फॉर्म लॉक असलेची खात्री करावी. द्विलक्षी विषय प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे त्यानुसार विद्यालयांनी प्रवेश निश्चित करणेची कार्यवाही तीन नियमित फेऱ्यांनंतर विशेष फेरी १ सोबत समांतरपणे सुरु होईल आणि पुढील प्रत्येक फेरीवेळी सुरु राहील, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

दि. ६ ते ९ जुलै – प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी अर्ज भाग एक भरू शकतात. अर्ज भाग एकमध्ये दुरूस्ती करता येईल, कोटा व द्विलक्षी प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोदविता येईल.

दि. १० व ११ जुलै – पात्र उमेदवारांची यादी करणे तसेच विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्व परीक्षण.

दि. १२ जुलै – निवड यादी प्रसिध्द करणे.

दि. १२ ते १४ जुलै – कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे.

दि. १४ जुलै – पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD