AISSMS News : ‘एआयएसएसएम’ सोसायटीच्या पॉलिटेक्निकचे ‘एनबीए’ कडून पुनर्मूल्यांकन

‘एनबीए’कडून भेटीदरम्यान पुनर्मूल्यांकन समितीने तंत्रनिकेतन मधील शैक्षणिक दर्जा तसेच सर्व सोयी-सुविधांची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर मानांकर जाहीर करण्यात आले आहे.

AISSMS News : ‘एआयएसएसएम’ सोसायटीच्या पॉलिटेक्निकचे ‘एनबीए’ कडून पुनर्मूल्यांकन
AISSMS Polytechnic

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (NBA) मूल्यांकन समितीने ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयास (AISSMS Polytechnic College) नुकतीच भेट दिली. त्यानंतर ‘एनबीए’कडून संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering), स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) व यंत्र अभियांत्रिकी या तीनही अभ्यासक्रमांना पुढील तीन शैक्षणिक वर्षांकरिता मानांकन जाहीर केले आहे. (Re-evaluation of AISSM Society Polytechnics by NBA)

‘एनबीए’कडून भेटीदरम्यान पुनर्मूल्यांकन समितीने तंत्रनिकेतन मधील शैक्षणिक दर्जा तसेच सर्व सोयी-सुविधांची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर मानांकर जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर एनबीए मूल्यांकनास फार महत्व आहे. एआयएसएसएमएस तंत्रनिकेतन मधील संगणक, स्थापत्य व यंत्र अभियांत्रिकी या विभागांना मानांकन मिळाल्यामुळे अभ्यासक्रमांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.

अभ्यास मंडळावरील सर्व नियुक्त्या नवे कुलगुरू करणार? अधिसभा सदस्यांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती, सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील यांनी तंत्रनिकेतन मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य सुरेंद्र गिराम, एनबीए समन्वयक डॉ. मेधा गिजरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख सुनील अंतुरकर, संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख विजय कुकरे, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख सतीश चिकुर्डे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एनबीए मानांकन मिळविणेसाठी विशेष परिश्रम घेतले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo