सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण

डॉ. रामकृष्णन रमण यांनी कुलगुरू पदावरून निवृत्त झालेल्या डॉ. रजनी गुप्ते यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. 

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण
Dr Ramakrishnan Raman

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) च्या (Symbiosisi International University) कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण (Dr Ramakrishnan Raman) यांची निवड करण्यात आली आहे. एक कुशल शिक्षणतज्ञ आणि अनुभवी व्यावसायिक म्हणून डॉ. रमण यांची ओळख आहे. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील पदवी, सिस्टीम्स आणि मार्केटिंगमधील एमबीए तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून व्यवस्थापनातील डॉक्टरेट पदवी असा त्यांचा उल्लेखनीय शैक्षणिक प्रवास आहे.

 

डॉ. रमण सिंबायोसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक आणि संचालक, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट- पुणे, चे  प्राध्यापक आणि संचालक, डीन- मॅनेजमेंट फॅकल्टी आणि डायरेक्टर- स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंट अशा विविध पदांवर त्यांनी एक दशकाहून अधिक काळ सिंबायोसिस मध्ये काम केले आहे. जपान, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील विद्यापीठांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने घेतला मोकळा श्वास ; कार्यालयाचे स्थलांतर

माहिती प्रणाली, आयटी स्ट्रॅटेजी, उद्योजकता, एआय, बिग डेटा मधील त्यांच्या विपुल संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. डॉ. रामकृष्णन रमण यांनी कुलगुरू पदावरून निवृत्त झालेल्या डॉ. रजनी गुप्ते यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. डॉ. गुप्ते यांनी सलग दोन टर्म सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) च्या  कुलगुरू म्हणून काम  केले आणि सोमवारी (दि. २३) सेवानिवृत्त झाल्या आहेत. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k