विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेेश प्रक्रियेला सुरूवात; राज्यातील ७७ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, नोंदणी केल्यानंतर २५ जूनपर्यंत ई व्हेरिफिकेशन टीमकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल.

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेेश प्रक्रियेला सुरूवात; राज्यातील ७७ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रक्रिया
Law Admission Process

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या CET परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (Centralised Admission Process) वेग आला आहे. सीईटी सेलकडून (CET Cell) पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाची प्रक्रियाही (Five year LLB) गुरूवारपासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २६ जून रोजी पहिल्या फेरीसाठी नोंदणीकृत यादी प्रसिध्द केली जाईल.

पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी सीईटी सेलकडून घेण्यात येणारी एमएचटी सीईटी परीक्षा ग्राह्य धरली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. त्यानुसार राज्यातील ७७ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

NEET पात्रता कटऑफ मध्ये यावर्षी २० गुणांनी वाढ; पाहा प्रवर्गनिहाय कटऑफ किती?

सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, नोंदणी केल्यानंतर २५ जूनपर्यंत ई व्हेरिफिकेशन टीमकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे २६ जून रोजी पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द होईल या यादीवर २८ जूनपर्यंत हरकती व सुचना नोंदवता येणार आहेत. महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द केला जाणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.

MBBS ला प्रवेश मिळेल का? राज्यातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांचे कटऑफ पहा एका क्लिकवर

पाच वर्षाच्या कायद्याच्या CAP नोंदणीसाठी आवश्यक  कागदपत्रे -

- दहावीचे व बारावीचे गुणपत्रक

- सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज

- सीईटी परीक्षेचे गुणपत्रक

- जन्म प्रमाणपत्र

- अधिवास प्रमाणपत्र

- जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गात प्रवेश मागितल्यास)

- PwD प्रमाणपत्र (असल्यास)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo