शिक्षक चौदा दिवस महाराष्ट्र पिंजून काढणार; निरक्षरांना शोधण्याची जबाबदारी

सर्वेक्षणाबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

शिक्षक चौदा दिवस महाराष्ट्र पिंजून काढणार; निरक्षरांना शोधण्याची जबाबदारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाच्या नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Literacy Campaign) राज्यात १७ ते ३१ ऑगस्ट यादरम्यान निरक्षरांचे (Illiterate) ऑफलाईन सर्वेक्षण (Survey) केले जाणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १२ लाख ४० हजार निरक्षकांना शोदण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे (Education Department) आहे. तर शिक्षकांना (Teacher) प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, सर्व खेडी, तांडे, शेतमळा, वार्ड आदी सर्व ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे.

राज्याचे शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी या सर्वेक्षणाबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सर्वेक्षणामध्ये निरक्षरांची नाव, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्ययावत माहिती सकलित केली जाणार आहे. तसेच राज्यातील एकूण निरक्षरांची संख्या निश्चित करणे आणि त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने शिक्षण उपल्बध करून देणे हा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

शैलजा दराडे यांच्या भावालाही केले शिक्षण खात्यातून निलंबित

निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७ ते ३१ ऑगस्ट या चौदा दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. या कालावधीतच शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमही राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा हे युनिट आहे. सर्व माध्यमांच्या, सवर् व्यवस्थापनाच्या शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी क्षेत्र निश्चित करून सर्वेक्षक-शिक्षक यांची नियुक्ती मुख्याध्यापक करतील. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापुर्वी व शाळा सुटल्यानंतर केले जाणार आहे. वय वर्षे १५ व त्यापुढील सर्व निरक्षरांचा यामध्ये समावेश केला जाईल.

सर्वेक्षणासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणधिकारी (योजना) व डाएटच्या प्राचार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण संचालक (योजना) हे राज्याचे नोडल अधिकारी असतील. तर शाळास्तरावर मुख्याध्यापक, प्राचार्य नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. त्याचप्रमाणे विविध समित्याही तयार केल्या जाणार आहेत. जिल्हास्तर, महापालिकास्तर, तालुकास्तर, वॉर्डस्तर, केंद्रस्तर, गावस्तर आणि शाळास्तर अशा समिती असतील.

सर्वेक्षणामध्ये शाळा, गाव, तालुका आणि जिल्हानिहाय निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये निरक्षर संख्या, लिंग, प्रवर्ग, दिव्यांग, शिकण्याचे माध्यम अशा विविध बाबींनुसार स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाणार आहे. शिक्षकांना घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo