CBSE कडून बारावीच्या अकाऊंटन्सी विषयाच्या उत्तरपत्रिकेत महत्वपूर्ण बदल
बोर्डाच्या वतीने शाळांना यासंदर्भातील माहिती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठविण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरुन त्यांना परीक्षेच्या वेळी हे लक्षात ठेवता येईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या बारावीच्या अकाऊंटन्सी (Accountancy) विषयाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांना उत्तर देण्यासाठी इतर विषयांप्रमाणेच सामान्य ओळींची उत्तरपत्रिका (Answer Sheet) मिळणार आहे. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचा तक्ता नसेल. हे बदल २०२४ पासून होणाऱ्या परीक्षेपासून लागू होतील.
सीबीएसईने आपल्या संलग्न शाळांना ही माहिती पाठवली आहे. बोर्डाच्या वतीने शाळांना यासंदर्भातील माहिती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठविण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरुन त्यांना परीक्षेच्या वेळी हे लक्षात ठेवता येईल.
शिक्षण विभागाच्या वादग्रस्त आदेशांची होळी ; शुक्रवारी शाळा बंद ठेवणार
बोर्डाच्या म्हणण्यानुसार, विविध संबंधितांकडून मिळालेल्या अभिप्रायांच्या आधारे लेखा विषयाच्या उत्तरपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत अकाउंटन्सी विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये छापील तक्ते (प्रीटेंड टेबल) असायचे. अकाउंटन्सी विषयाच्या उत्तरपुस्तिकेच्या शेवटच्या सात-आठ पानांचा टेबल फॉरमॅट होता.
प्रश्न सोडवण्यासाठी टेबल आवश्यक असल्यास, विद्यार्थ्यांनी त्याचे उत्तर एका ठिकाणी आणि शेवटच्या पानांवर त्याचे टेबल लिहावे लागायचे. त्यामुळे पेपर तपासताना शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता शिक्षकांना वेगवेगळ्या पानांवर एकच उत्तर मिळणार नाही. तथापि, विद्यार्थ्यांना तक्ता किंवा त्या स्वरूपाच्या प्रश्नांसाठी रेषा काढाव्या लागतील. पुढील वर्षपासून अकाऊंटन्सी विषयाची उत्तरपत्रिका इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांसारखीच असेल.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.