सार्वजनिक विद्यापीठांनी जबाबदारी ओळखावी - डॉ. अशोक लाहिरी 

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.अशोक लाहिरी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठाशी संवाद साधला. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र विभागांच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.

सार्वजनिक विद्यापीठांनी जबाबदारी ओळखावी - डॉ. अशोक लाहिरी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे :आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी विचाराचे आदान प्रदान आवश्यक असून सार्वजनिक विद्यापीठांनी आपली जबाबदारी ओळखून अधिकाधिक योगदान दिले पाहिजे.त्यात  शिक्षक आणि विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे आहे,  असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व सांख्यिकी विश्लेषक डॉ.अशोक लाहिरी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.अशोक लाहिरी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठाशी संवाद साधला. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र विभागांच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. या प्रसंगी त्यांनी उच्च शिक्षण, अर्थकारण, नवीन शैक्षणिक धोरण यासंदर्भात विचार यावेळी मांडले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. अपर्णा लळींगकर, राहुल पाखरे आदी उपस्थित होते.

डॉ. अशोक लाहिरी यांनी भारत सरकारचे अर्थविषयक सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच ते पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत . बंधन बँकेचे अध्यक्ष, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक असलेले डॉ.लाहिरी पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही आहेत.